शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
हल्ला, फसवणूक, विनयभंग अन् जुगाराचे आरोपी निवडणुकीच्या रिंगणात, चारपैकी एका उमेदवाराविरोधात न्यायालयीन खटला प्रलंबित
4
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
5
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
8
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
9
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
10
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
11
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
12
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
13
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
15
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
16
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
17
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
18
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
19
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?

अंबाबाईची शैलपुत्रीमाता रूपात पूजा

By admin | Published: October 04, 2016 12:24 AM

नवरात्रौत्सवाची तिसरी माळ : तुळजाभवानी देवीची अश्वारूढ रूपात पूजा

कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला सोमवारी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची श्री शैलपुत्रीमाता रूपात पूजा बांधण्यात आली. जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानी देवीची अश्वारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. रात्री अंबाबाईची पालखी तीन शिखर आकारात काढण्यात आली. नवरात्रौत्सवाच्या तिसऱ्या माळेला विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे, ‘लोकमत’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक मकरंद देशमुख यांच्या हस्ते श्री अंबाबाईचा अभिषेक झाला. दुपारच्या आरतीनंतर अंबाबाईची श्रीशैलपुत्री माता रूपात पूजा बांधण्यात आली. आमंत्रण नसताना शिवपत्नी सती दक्ष प्रजापतीच्या महायज्ञामध्ये गेली होती. तेथे शिवाचा अपमान झाल्यामुळे यज्ञकुंडामध्ये सतीने देहत्याग केला. हे समजल्यानंतर शिवाने वीरभद्रादी शिवगण यांना दक्ष यज्ञाचा विध्वंस करण्यासाठी पाठविले. या गणाने दक्ष यज्ञाचा विध्वंस केला तो दिवस अश्विन वद्य महाअष्टमीचा होता. त्यामुळे देवी सांप्रदायात शारदीय नवरात्रातील महाअष्टमीचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. त्यानंतर सतीने पर्वतराज हिमवंताच्या पोटी शैलपुत्री (पार्वती) नावाने जन्म घेतला. पूर्वजन्मसंचितानुसार याही जन्मी तिचा विवाह शिवाशीच झाला. करवीरनिवासिनी अंबाबाई ही साडेतीन शक्तिपीठातील एक देवता असल्याने यानिमित्ताने तिची शैलपुत्रीमाता रूपात बांधण्यात आली. ही नवदुर्गातील व नवरात्र व्रतामधील प्रथम देवता आहे. ही पूजा नीलेश ठाणेकर, दिवाकर ठाणेकर, श्रीनिवास जोशी यांनी बांधली. दिवसभरात सद्गुरू सेवा माऊली महिला मंडळ, सिद्धीविनायक महिला भजनी मंडळ, महालक्ष्मी भजनी मंडळ, नारायणी महिला सोंगी भजनी मंडळ, स्त्री संकल्पनांवर आधारित गाणी, ऋतुजा गोखले व दीपा उपाध्ये यांचे नृत्य हे सांस्कृतिक कार्यक्रम सादर झाले. रात्री साडेनऊ वाजता देवीची पालखी तीन शिखर आकारात काढण्यात आली. अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांच्या हस्ते पालखी पूजन झाले. जुना राजवाड्यातील श्री तुळजाभवानीदेवीची अश्वारूढ रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळकृष्ण दादर्णे, अमर झुगर, सारंग दादर्णे, विजय बनकर यांनी बांधली.देवी महात्म्य पठणास प्रतिसाद उत्सव काळात अंबाबाई मंदिरात मंत्रविद्यावाचस्पती मयूरा जाधव यांच्यावतीने सादर होणाऱ्या मंत्रपठणात भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महालक्ष्मी सुप्रभातम्, महालक्ष्मी सहस्त्रनाम, श्रीसुक्त, रूद्र, श्री शिवमहिम्न स्तोत्र, श्री विष्णू सुप्रभातम, पुरुष सुक्त, दत्तात्रेय वज्रकवच या मंत्रांचे पठण केले जाते. शास्त्रीय संगीत व संस्कृत भाषेत पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या जाधव यांना श्री जगद्गुरू शंकराचार्य श्रृंगेरीपीठ यांचे मार्गदर्शन लाभले आहे. देणगी आवाहनाची चर्चामहाराष्ट्रातील केवळ अंबाबाई हे एकमेव मंदिर आहे. जेथे श्रीपूजक किंवा मंदिराशी संबंधित कोणतीही यंत्रणा भाविकांकडे थेट रोख रक्कम किंवा देणगीची मागणी करत नाही. यंदाच्या वर्षी मात्र ‘देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी देवस्थान समितीमध्ये आपली देणगी जमा करावी’ यासाठी वारंवार माईकद्वारे आवाहन केले जात असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. महापालिकेचे वॉटर एटीएम बंद अंबाबाई दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी महापालिकेच्यावतीने विद्यापीठ गेट परिसरात वॉटर एटीएम बसविण्यात आले आहे. नवरात्रौत्सव सुरू होऊन तीन दिवस झाले तरी महापालिकेने हे एटीएम सुरू केलेले नाही. मात्र, भाविकांची पिण्याच्या पाण्याची गरज स्वयंसेवी संस्था व व्यक्तींनी पूर्ण केली आहे. श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांच्याकडूनही रांगांमध्ये थांबलेल्या भाविकांना पाणी दिले जाते.