लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवात खंडेनवमीनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची ‘तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असलेल्या रूपा’त पूजा बांधण्यात आली.गुरुवारी (दि. २८) अष्टमीच्या जागराचा होम झाल्यानंतर सकाळी साडेनऊ वाजता अंबाबाईचा गाभारा दर्शनासाठी उघडण्यात आला. त्यानंतर देवीचा अभिषेक व दुपारची आरती झाल्यानंतर अंबाबाईची तुळजाभवानी देवीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. तुळजापूरची आदिमाया अंबा भवानी ही अष्टभूजा दुर्गास्वरूप आहे. सिंहवाहिनी असलेल्या या तुळजाभवानी देवीवर हिंदवी स्वराज्य-संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची प्रचंड श्रद्धा होती. देवीची भक्ती ही त्यांच्या स्वराज्य-संस्थापनेचे प्रेरणास्थान होती. ही पूजा पराग ठाणेकर यांनी बांधली.शारदीय नवरात्रौत्सवात खंडेनवमीनिमित्त शुक्रवारी कोल्हापुरातील करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची ‘तुळजाभवानी देवी छत्रपती शिवाजी महाराजांना तलवार देत असलेल्या रूपा’त पूजा बांधण्यात आली. ही पूजा पराग ठाणेकर यांनी बांधली. (छाया : आदित्य वेल्हाळ)