दरम्यान शहरातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. लसीकरणामुळे सुरक्षिततेची भावना झाल्यामुळे त्यासाठी गर्दी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाबाबत सुरुवातीच्या टप्प्यात पुनम पाटील यांनी चांगले नियोजन केले होते; मात्र लसीकरणाबाबत लोकप्रतिनिधीना विश्वासात घेत नव्हत्या. त्यामुळे काही पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी होती.
लसीकरणाबाबत ठाम व नियमानुसार काम करत पुनम पाटील यांनी शिस्तबद्ध नियोजन केले होते. तर दुसऱ्या बाजूला पदाधिकाऱ्यांसह अन्य कोणांचे ऐकत नव्हत्या. त्यामुळे आठ दिवसांपासून त्यांच्या विरोधात असंतोष होता. याबाबत पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई यांचे याकडे लक्ष वेधले. त्यामुळे पुनम पाटील यांची कोरोना काॅन्टेट ट्रेसिंग विभागात बदली केली. त्यांच्या जागी प्रकाश पाटील यांची बदली करण्यात आली.