बुबनाळ : कवठेगुलंद-आलास माळावरील बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. काही त्रयस्थ व्यक्तींकडून बसथांब्याची तोडफोड करून नामशेष करण्याचा प्रयत्न सुरू आहे. याबाबत आलास ग्रामपंचायत व कुरंदवाड एस. टी. आगाराने लक्ष देऊन बसथांब्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी प्रवासी वर्गातून होत आहे.
औरवाडसह कृष्णा नदीपलीकडील सात गावे व कर्नाटकमधील प्रवाशांच्या सोयीसाठी आलास-कवठेगुलंद माळावर बसथांबा बांधण्यात आला आहे. दररोज अनेक प्रवासी ऊन, पावसात या थांब्याचा आधार घेत असतात. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या थांब्याची काही त्रयस्थ ग्रामस्थांकडून तोडफोड सुरू आहे. प्रवाशांसाठी असणारा कट्टा आणि लोखंडी अँगल अज्ञाताने उद्ध्वस्त करून लंपास केले आहे. यामुळे या बसथांब्याची दुरवस्था झाली असून, अंतिम घटका मोजत आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून, बसथांबा नामशेष होण्याआधी दुरुस्ती व्हावी, अशी मागणी प्रवासी करीत आहेत.
-----------------------------------
कोट - आलास-कवठेगुलंद माळावर असणाऱ्या या बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. तरी आलास ग्रामपंचायत व कुरुंदवाड एस. टी. आगाराने नव्याने उभारणी करावी.
- विनोद आलासे, सामाजिक कार्यकर्ते आलास
फोटो - १९०४२०२१-जेएवाय-०३
फोटो ओळ - आलास-कवठेगुलंद माळावर असणाऱ्या बसथांब्याची दुरवस्था झाली आहे. (छाया - रमेश सुतार, बुबनाळ)