कोल्हापूर : शेती औजारे बनविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिध्द पॉप्युलर स्टील वर्कस् या कंपनीचे चेअरमन दिलीपराव केशवराव जाधव यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.गेले दोन दिवस दिलिपराव यांच्यावर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या मागे त्यांचे बंधू कार्यकारी संचालक राजेंद्र उर्फ राजू जाधव, पत्नी, दोन मुले भूषण आणि युवराज, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.अंगभूत ज्ञान, प्रचंड निरक्षण क्षमता, कल्पकता आणि दूरदृष्टी याच्या जोरावर पॉप्युलर स्टीलला देशपातळीवर नावलौकिक मिळवून देण्याचे काम जाधव यांनी केले. त्यांच्या निधनाने एक कुशल आणि यशस्वी उद्योजकास कोल्हापूरची उद्यमनगरी मुकली आहे, अशा शब्दात अनेकांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.धार्मिक प्रवृत्ती आणि अतिशय विनम्र स्वभावाच्या दिलिपरावांनी समाजातील विविध घटकांविषयी आपुलकी जोपासली आहे. शहरात कोठेही महाप्रसाद असला की त्यामध्ये पॉप्युलरची मदत असतेच. कोल्हापूरच्या स्मशानभूमीचे विस्तारीकरण दुरुस्ती आणि सुशोभिकरणाचे काम दिलिपरावांनी सातत्याने दहा वर्षे केले आहे.दिलिप जाधव यांना अनेक संस्थांनी पुरस्काराने सन्मानित केले आहे. १९९५ मध्ये इमेन-मेक्सिको (अमेरिका) चा इंटरनॅशनल डायमंड स्टार फॉर क्वालिटी अॅवार्ड १९९६ मध्ये आॅल इंडिया आॅर्गनायझेशन इंटर प्रिनीरेअल कॉन्फीडरनेशन (नवी दिल्ली)चा आर्च आॅफ एक्सलंट अॅवार्ड, बिझनेस इनिशिएटिव्ह डेव्हलपमेंट बोर्ड (नवी दिल्ली)चा बिझनेस डेव्हलपमेंट अॅवार्ड, इंडिया इंटरनॅशनल फ्रेंडशीप सोसायटीचा भारत गौरव अॅवार्ड, इन्स्टिट्यूट आॅफ इकॉनॉमिक स्टडीजचा उद्योगरत्न अॅवार्ड, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन, स्मॅक व गोशिमा या संस्थांचा गुणी उद्योजक, आॅल इंडिया चेंबर आॅफ कॉमर्स, मुंबईचा उद्योगश्री, कोल्हापूर महानगरपालिकेचा कोल्हापूर भूषण आदी पुरस्कारांचा त्यात समावेश आहे.
‘पॉप्युलर स्टील’चे दिलीप जाधव यांचे निधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 2:53 PM
शेती औजारे बनविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील सुप्रसिध्द पॉप्युलर स्टील वर्कस् या कंपनीचे चेअरमन दिलीपराव केशवराव जाधव यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने वयाच्या ६७ व्या वर्षी निधन झाले.
ठळक मुद्दे‘पॉप्युलर स्टील’चे दिलीप जाधव यांचे निधनशेती औजारे बनविणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील उद्योजक