शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : भाजपाला धक्का! मंदा म्हात्रेंविरोधात संदीप नाईक यांनी फुंकली 'तुतारी'
2
"अररियात राहायचे असेल तर हिंदू व्हावे लागेल", भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान, सोशल मीडियावर व्हायरल
3
VIDEO: वक्फ विधेयकावरील JPC च्या बैठकीत बाचाबाची; TMC खासदार कल्याण बॅनर्जी जखमी
4
भाजपाला धक्का! माजी मंत्र्यांनी हाती घेतली अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा झेंडा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "उद्धव ठाकरेंच्या आणि भाजपाच्या बैठका सुरू, निवडणुकीनंतर एकत्र येणार"; बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
6
IND vs NZ 2nd Test : पुणे कसोटीसाठी भारताची रणनीती ठरली? एक महत्त्वाचा बदल होण्याची शक्यता
7
जुन्नरमध्ये पुन्हा मोठा ट्विस्ट: शेरकरांच्या एंट्रीला तुतारीच्या पदाधिकाऱ्यांचा विरोध; उमेदवारीच्या स्पर्धेत २ निष्ठावंत आघाडीवर!
8
MVA Seat Sharing: उद्धव ठाकरे-बाळासाहेब थोरातांमध्ये अडीच तास काय झाली चर्चा?
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"५ कोटी पकडले पण बाकीचे पैसे आमदारांच्या घरापर्यंत पोहचवले", रविंद्र धंगेकरांचा गंभीर आरोप
10
दोन मुली एकाच मुलाच्या पडल्या प्रेमात, कुटुंबीय अडथळा ठरत असल्याने गेले पळून, अखेर...  
11
भयंकर! आईने ५० रुपये न दिल्याने 'त्याने' रागाच्या भरात आजीला बाल्कनीतून खाली फेकलं अन्...
12
Madhabi Puri-Buch : SEBI च्या अध्यक्षा माधबी पुरी-बुच यांना सरकारकडून क्लीन चिट; कार्यकाळ पूर्ण करणार का?
13
अजित पवारांच्या बड्या नेत्याला विनातिकीट ठाकरे गटात प्रवेश; कोकणात मोठा धक्का
14
दिल्लीसह देशातील सर्व CRPF शाळांमध्ये बॉम्बस्फोटाची धमकी, पोलिसांनी सुरक्षा वाढवली
15
नवी मुंबईत भाजपाला धक्का! तिकीट नाकारताच संदीप नाईक शरद पवारांच्या राष्ट्रवादीत
16
Astro Tips: 'या' राशीची बायको मिळाली तर मित्रही तुमच्या नशिबाचा हेवा करतील!
17
BSNL ची नवी सुरुवात; नवा LOGO पाहिलात का? सोबतच ७ नव्या सेवा, हाय स्पीड इंटरनेटही
18
Sukesh Chandrashekar : "४८ तासांत रोख रक्कम..."; सुकेश चंद्रशेखरची करण जोहरला मोठी ऑफर, जॅकलिनचंही घेतलं नाव
19
परदेशात स्थायिक झालेल्या मराठी अभिनेत्रीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर ५ वर्षांनी होणार आई
20
"माझ्याविरोधात मोदी, शाहांच्या सभा घ्या, मला आघाडी वाढवायला मदत होईल’’, रोहित पवारांचा टोला 

प्रभागरचनेबाबत आज निर्णयाची शक्यता

By admin | Published: May 03, 2016 12:07 AM

निवडणूक आयोगाची बैठक : नगरपालिका निवडणुका बहुसदस्यीय की एकसदस्यीय; इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था

संदीप बावचे --जयसिंगपूर --नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जिल्ह्यातील नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी बहुसदस्यीय की एकसदस्यीय प्रभागरचना होणार याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे़ मंगळवारी (दि़ ३ मे) निवडणूक आयोगाने मुंबई येथे प्रशासकीय यंत्रणेची बैठक बोलावली आहे़ यामध्ये बहुसदस्यीय की एकसदस्यीय प्रभागरचना याबाबत चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता आहे़ यामुळे या बैठकीकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे़येत्या डिसेंबरमध्ये नगरपालिकांच्या मुदती संपणार आहेत़ त्यामुळे नोव्हेंबर २०१६ मध्ये नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम घेणे क्रमप्राप्त आहे़ याची तयारी एप्रिल २०१५ पासून सुरू करण्यात आली आहे़ त्यानुसार नगरपालिका शहरातील लोकसंख्येच्या आधारे प्रभागरचना करण्याकरिता प्रारूप नकाशा गुगल मॅपवर टाकण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले होते़ गेल्या दहा वर्षांत वाढलेली लोकसंख्या लक्षात घेता नगरसेवकांची संख्या वाढणार याचीही शक्यता गृहीत धरण्यात आली होती़ मार्च २०१६ मध्ये जनगणना आकडेवारीनुसार व वाढीव लोकसंख्येच्या आधारे जिल्ह्यातील प्रत्येक पालिकेकडून जिल्हा प्रशासनाकडे अहवाल पाठविला आहे़ यानुसार प्रत्येक नगरपालिकेकडे किमान एक ते दोन सदस्यसंख्या वाढणार आहेत. शिवाय एक सदस्यीय प्रभागरचनेनुसारच हा अहवाल तयार करण्यात आला आहे़ सन २०११ मध्ये झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुका या बहुसदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे झालेल्या होत्या़ मतदारसंख्या वाढल्याने त्यावेळी प्रचार करताना उमेदवारांची दमछाक झाली होती़ सत्तेवर आलेल्या सरकारकडून पालिकेच्या निवडणुका एकसदस्यीय प्रभाग रचनेनुसार होतील, असे जाहीर केले होते़; पण गेल्या सहा महिन्यांतील घडामोडी पाहता यामध्ये बदल होण्याची शक्यता वर्तविली जात आहे़ पुन्हा बहुसदस्यीय प्रभागरचना होणार, अशी चर्चा सुरू झाली आहे़ आयोगाने प्रभागरचनेबाबत गोपनियता ठेवल्याने इच्छुकांमध्ये संभ्रमावस्था आहे़ पालिकांकडून गटानुसार नकाशाची माहिती निवडणूकआयोगाकडे सध्या नगरपालिकांकडून गटानुसार नकाशाची माहिती निवडणूकआयोगाकडे पाठविण्यात आली आहे़ येत्या जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रभाग रचनेच्या कामास सुरुवात होण्याचे संकेत आहेत़