ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या किणे ग्रामपंचायतीकरिता आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष विष्णुपंत केसरकर, माजी पंचायत समिती सभापती मसणू सुतार यांच्यात काट्याची व पारंपरिक लढत होण्याची शक्यता असतानाच तरुण कार्यकर्त्यांनी अमृत कातकर यांच्या नेतृत्वाखाली तिसरा पर्याय ठेवल्याने यावेळी कोणत्याही परिस्थितीत धक्कादायक निकाल लागणार हे स्पष्ट आहे.विष्णुपंत केसरकर व मसणू सुतार हे दोघेही परस्परांचे कट्टर विरोधक समजले जातात. ग्रामपंचायतीच्या राजकारणात सुतार हे नेहमीच उजवे ठरत आले आहेत, तर संस्था पातळीवर केसरकर यांनी आपले प्रभुत्व राखण्यात यश मिळविले आहे. ४५ वर्षांच्या सुतार यांच्या ग्रामपंचायत वर्चस्वाला सुरुंग लावण्यासाठी केसरकर यांनी स्वत: गावात तळ ठोकल्याने निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.‘स्वाभिमानी’चे सखाराम केसरकर यांनी विष्णुपंत केसरकर यांच्याशी हातमिळवणी केली आहे. कातकर गटाने नऊ जागांपैकी पाच जागांवर उमेदवार दिले आहेत. सुतार यांच्या अस्तित्वाची, तर केसरकर यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक ठरणार आहे. प्रभागनिहाय उमेदवारसत्ताधारी : मसणू सुतार यांची लक्ष्मी विकास आघाडी : प्रभाग १ : सुरेश गिलबिले, शांता गुडूळकर, सुमन वांजोळे, प्रभाग २: सचिन भातकांडे, शीतल केसरकर, पुष्पा कांबळे, प्रभाग ३ : जयवंत सुतार, सुशीला दळवी, श्रीकांत बामणे.विष्णुपंत केसरकर यांची रवळनाथ आघाडी प्रभाग १ : दयानंद नाईक, लता पाटील, विमल सुतार, प्रभाग २ : सखाराम केसरकर, रंजना जाधव, आक्काताई कांबळे, प्रभाग ३ : विजय केसरकर, भारता केसरकर, नामदेव बामणे.तिसरी जयशिवराय आघाडी प्रभाग १ : प्रकाश पाटील, प्रभाग २ : अमृत कातकर, दीपिका पाटील, प्रभाग ३ : पांडुरंग श्ािंदे, सरिता गुडूळकर. पॅनेलप्रमुखांचे चिरंजीव विजय केसरकर व जयवंत सुतार यांच्यात थेट लढतसखाराम केसरकर, जयवंत सुतार, नामदेव बामणे, श्रीकांत बामणे हे विद्यमान सदस्य निवडणूक रिंगणात.सत्ताधाऱ्यांकडून ऊस उचल विलंब, तर विरोधकांकडून विकासकामांच्या अभावाच्या मुद्द्यांचे भांडवल.मुंबईकर मतदारांची भूमिकाही ठरणार महत्त्वाची.
किणे येथे धक्कादायक निकालाची शक्यता
By admin | Published: April 15, 2015 9:12 PM