कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेतील 19 नगरसेवकांचे पद सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. जात प्रमाणपत्र वेळीच सादर न केल्याने या नगरसोवकांचे पद रद्द करण्यात आले आहे. पद रद्द करण्यात आलेल्या नगरसेवकांमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, ताराराणी आघाडी आणि शिवसेनेच्या एका नगरसेवकाचा समावेश आहे.
दरम्यान , नगरसेवक निकाला बाबत संभ्रम आहे. सुप्रीम कोर्टाने याचिका फेटाळली आहे, याचा अर्थ नगरसेवक पद रद्द झाले असा होत नाही. कारवाईचा निर्णय राज्य सरकारने घ्यायचा आहे. एकतर्फी कारवाई होऊ नये म्हणून याचिका दाखल झाली होती.
कोल्हापूर महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांना सुप्रीम कोर्टाचा दणका बसला आहे. जातवैधता प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने नगरसेवक पद करण्याच्या सूचना सर्वोच्च न्यायालयाने सरकारला दिल्या आहेत.
जातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्यांमध्ये अश्विनी रामाणे शमा मुल्ला, वृषाली कदम यांच्यासह सुभाष बुचडे, संदीप नेजदार, स्वाती यवलुजे, नीलेश देसाई, कमलाकर भोपळे, अफजल पिरजादे, किरण शिराळे, हसीना फरास, सचिन पाटील, संतोष गायकवाड, अश्विनी बारामते, सविता घोरपडे, विजयसिंह खाडे-पाटील, दीपा मगदूम, रिना कांबळे, मनीषा कुंभार, नियाज खान या नगरसेवकांचा समावेश आहेजातवैधता प्रमाणपत्र सादर न केलेले कोल्हापूर मधील नगर सेवक१. संदिप नेजदार२. दीपा मगदूम३. स्वाती येवलूजे४. हसीना फरास५. अश्विनी रामाणे६. किरण शिराळे७. सचिन पाटील८. विजय खाडे पाटील९. नियाझ खान१०. मनीषा कुंभार११. अश्विनी बारामते१२. संतोष गायकवाड१३. शमा मुल्ला१४. सविता घोरपडे१५. वृषाली कदम१६. रीना कांबळे१७. गीता गुरव१८. कमलाकर भोपळे१९. अफझल पिरजादे