शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
4
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
5
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
6
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
7
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
8
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
9
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
11
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
12
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
13
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
15
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
16
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
17
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
18
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
19
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
20
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी

मंत्री पदासाठी ‘पी. एन. - सतेज’ यांचे दिल्लीत लॉबिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2019 11:09 AM

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता असल्याने कॉँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून, कार्यकर्त्यांच्या नजरा कॉँग्रेसच्या यादीकडे लागल्या आहेत.

ठळक मुद्देमंत्री पदासाठी ‘पी. एन. - सतेज’ यांचे दिल्लीत लॉबिंगरस्सीखेच सुरू : कार्यकर्त्यांच्या नजरा काँग्रेस यादीकडे

कोल्हापूर : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या, मंगळवारी होण्याची शक्यता असल्याने कॉँग्रेसमध्ये जोरदार लॉबिंग सुरू झाली आहे. आमदार सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात मंत्रिपदासाठी रस्सीखेच सुरू झाली असून, कार्यकर्त्यांच्या नजरा कॉँग्रेसच्या यादीकडे लागल्या आहेत.

कॉँग्रेसला १३ मंत्रिपदे मिळणार आहेत, त्यापैकी अगोदरच दोघांना संधी दिली आहे, आता विस्तारात आठ लोकांना संधी दिली जाणार असून, मुंबई, खानदेश, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला  न्याय द्यायचा आहे, यामध्ये कोणाची राजकीय ताकद भारी पडते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.कॉँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कोल्हापुरात अलिकडील १0-१५ वर्षांत कमालीची पडझड झाली. त्याचा परिणाम २००९ व २०१४ च्या निवडणुकीत दिसला. २०१९ च्या निवडणुकीत पक्षाने दमदार पुनरागमन केले आणि चार आमदार निवडून आले. त्यात अनपेक्षितपणे महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्याने कॉँग्रेस आमदारांसह कार्यकर्त्यांच्या अपेक्षा उंचावल्या. मंत्रिपदासाठी सतेज पाटील व पी. एन. पाटील यांनी गेले २०-२२ दिवस जोरदार फिल्डिंग लावली आहे. मुंबई- दिल्ली वाऱ्या सुरू असून, हायकमांडकडे जोरदार लॉबिंग लावले आहे.भाजपचे फोडाफोडीचे राजकारण सुरू असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे यांनी राजीनामा दिल्याने पक्ष अडचणीत आला होता. अडचणीच्या काळात त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी पडली, ती सक्षमपणे सांभाळत चार आमदार निवडून आले.

पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात गृहराज्यमंत्री म्हणून प्रभावीपणे काम केले. त्यांचे थेट काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्याशी संबंध आहेत, त्याचबरोबर डॉ. डी. वाय. पाटील यांचे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.निष्ठावंत नेता म्हणून पी. एन. पाटील यांची ओळख काँग्रेस श्रेष्ठींकडे आहे. त्यात दोनवेळा पराभूत होऊन तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने विजय खेचून आणला. २००४ ला स्वर्गीय विलासराव देशमुख यांच्या मंत्रिमंडळात त्यांना संधी मिळणार असे वाटत होते; मात्र त्यांना मंत्रिपदाने हुलकावणी दिली. काँग्रेस निष्ठा, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, अमित देशमुख यांच्याबरोबरच गांधी घराण्याशी संबंधित व्यक्तींबरोबर असलेल्या सलोख्याच्या बळावर त्यांनी मंत्रिपदासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.मंत्रिमंडळ विस्तारात काँग्रेसची सहा कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदी शपथ घेणार आहेत. यामध्ये कॅबिनेट म्हणून मराठवाड्यातून अशोक चव्हाण, अमित देशमुख, पश्चिम महाराष्ट्रातून पृथ्वीराज चव्हाण, मुंबई व कोकण विभागातून वर्षा गायकवाड, विदर्भातून विजय वडेट्टीवार, यशोमती ठाकूर, अशी सहा कॅबिनेट निश्चित मानली जातात. याशिवाय सुनील केदार, के. सी. पाडवी, विश्वजित कदम, प्रणिती शिंदे यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे; त्यामुळे या लाटेत कोणाची ताकद भारी पडते, त्यांच्याच पदरात मंत्रिपद पडणार आहे.मुश्रीफ यांना ‘ग्रामविकास’ खातेआमदार हसन मुश्रीफ यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्री म्हणून नाव निश्चित झाले आहे. त्यांच्यावर सहकार किंवा ग्रामविकास खात्याची जबाबदारी सोपवली जाणार अशी चर्चा होती; मात्र ‘ग्रामविकास’ खाते मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे.‘विधानपरिषद’ ‘सतेज’ यांच्यासाठी अडसरविधानपरिषदेच्या सदस्यांना मंत्रिपद द्यायचे नाही, असा एक मतप्रवाह कॉँग्रेस श्रेष्ठींमध्ये आहे. हेच सतेज पाटील यांच्यासाठी अडसर ठरत असून, त्यामुळेच ‘पी. एन.’ यांचे नाव शनिवार (दि. २१)पासून आघाडीवर राहिले आहे. 

 

टॅग्स :Politicsराजकारणkolhapurकोल्हापूरSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलHassan Mianlal Mushrifहसन मियांलाल मुश्रीफP. N. Patilपी. एन. पाटील