शहरं
Join us  
Trending Stories
1
नाना पटोलेंनी प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा; काँग्रेसकडून वृत्ताचे खंडन
2
थोडक्यात वाचलास, माझी सभा झाली असती तर...; प्रीतीसंगमावर अजित पवार-रोहित पवारांची भेट!
3
Raj Thackeray MNS: राज ठाकरे यांचे इंजिन धोक्यात, पक्षाची मान्यता जाणार का?
4
पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाची दाणादाण, टीम इंडिया विजयापासून पाच पावलं दूर
5
रश्मिका, तू कोणाशी लग्न करणार? 'श्रीवल्ली'ने दिलेलं उत्तर ऐकून एकच हशा पिकला
6
Maharashtra Assembly Election Result 2024: आता नवीन सरकार लगेच स्थापन होणे अनिवार्य नाही; राष्ट्रपती राजवटीची शक्यता नाही
7
महायुतीला १३८ जागांवर ५० टक्क्यांहून अधिक मतं, १६ ठिकाणी लाखांचं मताधिक्य, अवाक् करणारी आकडेवारी
8
अदानी समूहाच्या शेअर्समध्ये पुन्हा तेजी; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: कोणत्या पक्षाचे किती विद्यमान आमदार पराभूत?; ६ आमदाराचे डिपॉझिटही जप्त
10
"विचारधारा वगैरे आता विसरायला हवं"; धक्कादायक निकालानंतर जितेंद्र आव्हाडांचं विधान
11
पराभूत झालो असलो तरी...; विधानसभा निकालानंतर सुप्रिया सुळेंची पहिली प्रतिक्रिया
12
"देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंना भेटून...", निवडणुकीनंतर अनुपम खेर यांची खास पोस्ट
13
Stock Market Boom : राज्यातील महायुतीच्या 'महा'विजयानं शेअर बाजारात जल्लोष, Sensex-Nifty मध्ये तेजी; Adani चे शेअर्स वधारले
14
Sajjad Nomani: "मी शब्द मागे घेतो, बिनशर्त माफी मागतो"; सज्जाद नोमानींकडून खुलासा
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गूड न्यूज; नव्या वर्षात मिळू शकतं मोठं गिफ्ट, १८६% वाढू शकते सॅलरी
16
शेतकऱ्यांसाठी सुखद घटना! निवडणूक संपताच राज्यातील सोयाबीनचे भाव वधारले
17
Maharashtra Assembly Election Result 2024: संख्याबळानुसार मंत्रिपदांचा आग्रह! राज्य मंत्रिमंडळाचा संभाव्य फॉर्म्युला काय?
18
केवळ ₹ ५००० ची SIP सुरू करा; २५ वर्षांनंतर मोजता मोजता थकाल; पाहा कसा काम करेल Step-Up फॉर्म्युला
19
पाेलिसांनाच ‘डिजिटल अरेस्ट’! पोलिस उपायुक्तांच्या पत्रकार परिषदेतील प्रकार, काय घडलं?
20
"दैत्याचं तेच झालं, जे नेहमी होतं"; उद्धव ठाकरेंवर कंगना रणौत यांचे टीकास्त्र

टपाल तिकिटावर छापा स्वत:चे चित्र !

By admin | Published: October 22, 2015 12:34 AM

जयसिंगपूर पोस्ट कार्यालयाकडून सुविधा

जयसिंगपूर : जयसिंगपूर पोस्ट कार्यालयाने स्वत:चे छायाचित्र व आवडीची रचना असलेले टपाल तिकीट छापून घेण्याची संधी देऊन शहरवासियासाठी नवीन उपक्रम राबविला आहे. तसेच या विभागाच्यावतीने ‘माय स्टॅँम्प’ ही योजना सुरू केल्यामुळे अशी सुविधा देणारी जयसिंगपूर पोस्ट जिल्ह्यातील एकमेव कार्यालय आहे, असे प्रतिपादन नगराध्यक्ष सुनील पाटील-मजलेकर यांनी केले.जागतिक टपाल दिनानिमित्त भारतीय टपाल विभागांतर्गत राष्ट्रीय टपाल सप्ताह निमित्त विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून जयसिंगपूर पोस्ट कार्यालयात ‘माय स्टॅम्प’ या नावीन्यपूर्ण योजनेचा प्रारंभ नगराध्यक्ष मजलेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी डाक अधीक्षक रमेश पाटील होते. प्रारंभी पोस्टमास्तर एम. बी. सिदनुर्ले यांनी योजनेची माहिती दिली. ‘माय स्टॅँम्प’मध्ये जयसिंगपूर परिसरातील नागरिकांना आता आपली ‘इमेज’ टपाल तिकिटावर झळकविण्याची नामी संधी उपलब्ध झाली आहे. तसेच आपणाला हवे असणारी रचनाही वापरता येणार आहे. ग्राहकांना आपल्या छायाचित्राचे टपाल तिकीट बनवून मिळणार आहे. राष्ट्रीय टपाल सप्ताहाचे निमित्त साधून काही काळ हा उपक्रम सुरू राहणार आहे, असे त्यांनी सांगितले.यावेळी टपाल तिकीट संग्राहक डॉ. सुनील पाटील यांनी संकलित केलेल्या अत्यंत दुर्मीळ व ऐतिहासिक टफाल तिकिटांचे एक दिवसीय प्रदर्शन भरविण्यात आले होते. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष आण्णासाहेब दानोळे, उद्योगपती अशोक कोळेकर, डॉ. महावीर अक्कोळे, डॉ. नलिनी पाटील, राज धुदाट, नंदकुमार गायकवाड यांच्यासह नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)