शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राज की उद्धव? शरद पवारांनी त्यावेळीच दिलं होतं उत्तर; व्हिडीओ पुन्हा होतोय व्हायरल
2
डॉ.शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणात ट्विस्ट; सुसाईड नोटमध्ये महिलेचे नाव, मोठा खुलासा
3
काँग्रेसची राजकीय ताकद राहिली नाही, त्यासाठी काय करणार ? हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलं उत्तर
4
तोंड दाखवायला जागा...! मुलीच्या सासऱ्याबरोबरच मुलीची आई पळून गेली; मुलगा म्हणतो... 
5
अपघातात मृत्यू झालेल्या महिलेसोबत वॉर्ड बॉयचं संतापजनक कृत्य, संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद
6
सोलापुरातील डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; हॉस्पिटलमधील महिला प्रशासन अधिकाऱ्यास केली अटक
7
"मुळावरच घाव घालायचं काम चालू आहे", महाराष्ट्रात हिंदी सक्तीवरुन मराठी अभिनेता स्पष्टच बोलला
8
काश्मीरमध्ये ऐन उन्हाळ्यात ढगफुटी; अचानक आलेल्या पुरात २ जण वाहून गेले, १०० लोकांना वाचविले
9
तनिषा भिसे प्रकरण: पोलिसांच्या दबावापुढे ससून प्रशासन झुकले; पोलिसांनी 'या' ४ मुद्द्यांवर मागितला होता, 'अभिप्राय'
10
पुस्तकाच्या जन्माची गोष्ट : ‘ग्रेस’ यांचे पहिले पुस्तक असे आले
11
‘एआय’ ऐक ना रे माझं, तूच मला समजू शकतोस... खरंच एआय समजून घेतं का?
12
लेख : चिंब पावसानं रान औंदा होणार आबादानी!
13
साप्ताहिक राशीभविष्य: ४ राशींना बक्कळ लाभ, ४ राशींना मध्यम फलदायी; बचतीत फायदा, यश-प्रगती!
14
अवघ्या ०.०१३ रनरेटमुळे वेस्टइंडीजचा संघ एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेतून बाहेर
15
स्क्रीनच्या पलीकडची सुट्टी; पालक म्हणून मुलांसाठी तुम्ही इतक्या सगळ्या गोष्टी करू शकता
16
इलॉन मस्क यांच्या आईने जिंकली भारतीयांचे मने; पंतप्रधान मोदींच्या ट्विटला दिलं होतं उत्तर
17
अमेरिकेला राजा नको...! हजारो अमेरिकन डोनाल्ड ट्रम्प विरोधात रस्त्यावर; हिटलरची उपमा...
18
लेख: वेळप्रसंगी आम्ही ‘भ’ची बाराखडी जाहीरपणे म्हणून दाखवतो...
19
राज-उद्धव एकत्र येण्याची चर्चा, मात्र मनसेनं घेतला असा पवित्रा, संदीप देशपांडे म्हणाले,"महाराष्ट्रासाठी एकत्र येणं म्हणजे…”,,

पोस्टमॉर्टेम केले महिलेचे, अहवाल दिला पुरुषाचा!; कोल्हापुरातील सीपीआरचा अजब कारभार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 11:50 IST

प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह

कोल्हापूर : गळतगा (ता. निपाणी, जि. बेळगाव) येथे दुचाकीच्या धडकेत जखमी झालेल्या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर सीपीआरने शवविच्छेदन अहवालात महिलेच्या ऐवजी पुरुषाचा उल्लेख केला. या प्रकारामुळे नातेवाईक आणि सदलगा (ता. निपाणी) पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना पुन्हा सीपीआरमध्ये चकरा माराव्या लागल्या. सीपीआरचा अजब कारभार पुन्हा चव्हाट्यावर आल्याने प्रशासनाच्या कामकाजाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.गळतगा येथील मंगल बाळकृष्ण मोरे (वय ६८) या शेतात जाताना दुचाकीने दिलेल्या धडकेत गंभीर जखमी झाल्या होत्या. मंगळवारी (दि. ४) अपघात झाल्यानंतर नातेवाइकांनी त्यांना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचारादरम्यान शुक्रवारी (दि. ७) त्यांचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यू असल्याने सीपीआर पोलिस चौकीने याची माहिती सदलगा पोलिसांना दिली. सीपीआर प्रशासनाने मंगल यांच्या मृतदेहाचे विच्छेदन करून नातेवाइकांना अहवाल दिला. नातेवाईक घाईगडबडीत अहवाल घेऊन घरी गेले. सदलगा पोलिस ठाण्यात अहवाल सादर केल्यानंतर त्यावर मृत मंगल यांचा पुरुष असा उल्लेख असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यांनी नातेवाइकांना बोलवून घेऊन चुकीची दुरुस्ती करून आणण्यास सांगितले. त्यानंतर सदलगा पोलिस ठाण्यातील एक अंमलदार आणि मोरे यांच्या नातेवाइकांनी सोमवारी सीपीआरमध्ये येऊन शवविच्छेदन अहवाल दुरुस्तीची मागणी केली. प्रशासनाच्या भोंगळ कारभाराबद्दल रुग्णाचे नातेवाईक आणि कर्नाटक पोलिसांनी नाराजी व्यक्त केली.आधी चुका, नंतर दुरुस्तीसीपीआरमधील अनेक कर्मचारी कामकाजात गंभीर चुका करतात. शवविच्छेदन अहवाल, मृत्यू दाखल्यांमध्ये अनेकदा चुका आढळतात. पुन्हा त्या चुकांची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांना वेळ घालवावा लागतो. वरिष्ठ अधिका-यांनी यात लक्ष घालण्याची गरज आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालय