शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

‘एमआयडीसी’तील ४० टक्के बांधकामाच्या निर्णयास स्थगिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 1:27 PM

उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात आर्थिक मंदीची स्थिती असल्याने भूखंडांवर ४० टक्के बांधकामाची सक्ती औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येऊ नये, अशी मागणी उद्योजकांनी शासनाकडे केली होती. त्यावर

ठळक मुद्देऔद्योगिक विकास महामंडळाचे परिपत्रकजुनाच निर्णय लागू करण्याची उद्योजकांची मागणी

कोल्हापूर : औद्योगिक वसाहतींमधील (एमआयडीसी) मध्यम व लघू उद्योजकांना त्यांच्या भूखंडावर बांधकाम करण्याबाबत १० ते २० टक्क्यांपर्यंतचा जुनाच निर्णय लागू करावा, अशी मागणी कोल्हापुरातील उद्योजकांनी शुक्रवारी केली. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने औद्योगिक वसाहतीतील भूखंडावर ४० टक्के बांधकाम करण्याच्या निर्णयास स्थगिती दिली आहे. त्यावर उद्योजकांच्या विविध संघटनांच्या पदाधिकारी, प्रतिनिधींनी संबंधित मागणी केली.

उद्योग आणि व्यवसाय क्षेत्रात आर्थिक मंदीची स्थिती असल्याने भूखंडांवर ४० टक्के बांधकामाची सक्ती औद्योगिक विकास महामंडळाकडून करण्यात येऊ नये, अशी मागणी उद्योजकांनी शासनाकडे केली होती. त्यावर २१ जून २०१९ पूर्वी ज्या भूखंडधारकांनी इमारत पूर्णत्वाचा दाखला घेतला आहे, तसेच त्यांचे उत्पादन सुरू असल्यास ४० टक्के बांधकामाची सक्ती होणार नाही. ज्या भूखंडांवर उत्पादन सुरू नाही, अशा भूखंडांवर तातडीने ४० टक्के बांधकाम करावे लागणार आहे. अन्यथा ते भूखंड परत घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे महामंडळाने स्पष्ट केले आहे. औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी हे परिपत्रक बुधवारी (दि. २७) काढले आहे. या निर्णयामुळे २१ जूनआधीच्या उद्योजकांना दिलासा मिळणार असला, तरी नवीन बांधकाम करणाऱ्या उद्योजकांना फटका बसणार आहे. त्यामुळे ४० टक्के बांधकामाबाबतचा सध्याचा निर्णय सर्वांसाठी लागू करावा; अथवा पूर्वीचा १० ते २० टक्क्यांपर्यंतचा बांधकामाचा जुना निर्णय लागू करावा, अशी मागणी उद्योजकांमधून होत आहे.

दरम्यान, याबाबत ‘एमआयडीसी’चे म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रादेशिक अधिकारी धनाजी इंगळे यांना दूरध्वनी केला असता, त्यांच्याशी संपर्क झाला नाही. 

औद्योगिक विकास महामंडळाने सध्याचा घेतलेला नवा निर्णय नवीन बांधकाम करणाºया उद्योजकांसाठी अन्यायकारक ठरणारा आहे. त्यामुळे या भूखंडांवरील बांधकामाबाबत कायमची स्थगिती देऊन हा निर्णय सर्व उद्योजकांसाठी लागू करण्यात यावा.- संजय शेटे, अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज.........................................................................................................सध्या उद्योजक हे आर्थिक मंदीचा सामना करीत आहेत. अशा स्थितीत उद्योजकांना पाठबळ देण्याऐवजी बांधकाम सक्तीबाबतचा निर्णय घेणे हे अन्यायकारक आहे. या नव्या निर्णयाऐवजी जुनाच निर्णय लागू करावा, अशी मागणी आम्ही उद्योजकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत जिल्हाधिकारी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.- अतुल पाटील, अध्यक्ष, ‘स्मॅक’...............................................................................................................या नव्या निर्णयामुळे २१ जूनआधीच्या उद्योजकांना दिलासा मिळणार आहे. मात्र, नवीन बांधकाम करणा-या उद्योजकांसाठी हा निर्णय मारक आहे. त्यांचा आणि आर्थिक मंदीच्या स्थितीचा विचार करून औद्योगिक विकास महामंडळाने या नव्या निर्णयाबाबत फेरविचार करावा.- अतुल आरवाडे, अध्यक्ष, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशन 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMIDCएमआयडीसी