शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

मराठा बँक शेअर्स ठेवीदारांचे आंदोलन स्थगित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2019 1:04 PM

मराठा बँकेच्या ४८ हजार सभासदांच्या शेअर्स ठेवी परत मिळाव्यात यासाठी मराठा संघटनेतर्फे गुरुवारी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सारस्वत बँकेने ६ मार्चपर्यंत सहकार आयुक्तांच्या निर्णयापर्यंत आंदोलन करू नये, अशी विनंती केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.

ठळक मुद्देमराठा बँक शेअर्स ठेवीदारांचे आंदोलन स्थगितसहा मार्चपर्यंत निर्णयाचे सारस्वत बँक प्रशासनाचे आश्वासन

कोल्हापूर : मराठा बँकेच्या ४८ हजार सभासदांच्या शेअर्स ठेवी परत मिळाव्यात यासाठी मराठा संघटनेतर्फे गुरुवारी उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सारस्वत बँकेने ६ मार्चपर्यंत सहकार आयुक्तांच्या निर्णयापर्यंत आंदोलन करू नये, अशी विनंती केल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.कोल्हापूर मराठा बँकेचे सारस्वत बँकेत ६ मार्च २००९ रोजी विलीनीकरण झाले. विलीनीकरणाच्या आदेशानुसार शेअर्स ठेवी सभासदांना परत मिळाल्या नाहीत. मात्र, याच पद्धतीने कोल्हापूर जनता बँक, शाहू बँक, आदी बँकांचे विलीनीकरण झाल्यानंतर त्या-त्या सभासदांना ठेवी परत देण्यात आल्या होत्या. त्यानुसार मराठा बँकेच्या सभासदांना या ठेवी मिळणे गरजेचे होते; पण सारस्वत बँकेने दहा वर्षे झाली तरी या ठेवी परत दिल्या नाहीत. म्हणून मराठा संघटनेतर्फे गेल्या काही वर्षांपासून शेअर्स ठेवीचे पैसे परत मिळावेत. याकरिता आंदोलन केले जात आहे.

यातीलच एक भाग म्हणून गुरुवारी संघटनेतर्फे उपोषणाचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, सारस्वत बँकेतर्फे कार्यकारी संचालिका स्मिता संधाने यांनी ६ मार्च २०१९ ला अनुत्पादित कर्जाची वसुली व त्यावरील झालेला बँकेचा खर्च हा आॅडिट करून घेतला जाईल.

तो ताळेबंद सहकार आयुक्तांकडे पाठविला जाईल. त्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार योग्य तो निर्णय घेतला जाईल. तरी सहकार आयुक्तांचा निर्णय होईपर्यंत आंदोलन करू नये, अशी सारस्वत बँक प्रशासनातर्फे विनंती केली. त्यानुसार संघटनेतर्फे तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

६ मार्चनंतर निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा संघटनेतर्फे देण्यात आला आहे. यावेळी बाळ घाटगे, नितीन शेळके, राजू सावंत, विजय पाटील, सदानंद सुर्वे, प्रमोद पाटील, नारायण मोरे, धैर्यशील जगताप, नारायण मोरे, संजय पाटोळे, रणजित भोसले, आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रkolhapurकोल्हापूर