कोल्हापूर : महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या जोरदार पावसाने सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. त्यात बटाट्याचे पीक काढणीस आले असून त्यामध्ये नेमके किती नुकसान होणार, याचा अंंदाज येत नसल्याने त्याचा परिणाम बटाट्याच्या दरावर झाला आहे. घाऊक बाजारात सरासरी २९ रुपये बटाटा आहे.कोल्हापुरात इंदोर, आग्रा, कर्नाटकातून बटाट्याची आवक होते. बटाटा काढणीस आला आहे. त्यात गेल्या आठ-पंधरा दिवसांत सगळीकडेच जोरदार पाऊस झाल्याने बटाट्याचे नुकसान झाले आहे. मात्र नेमके किती नुकसान झाले, याचा अंदाज शेतकऱ्यांना येत नाही. त्यामुळे कोल्ड स्टोअरेजमधील बटाटा विक्रीसाठी काढला जात नाही. त्यामुळे सध्या बाजारात तेजी दिसते. येत्या चार-पाच दिवसांत नवीन बटाट्याची आवक सुरू होण्याची शक्यता असून, त्यानंतर दर स्थिर राहतील असा अंदाज आहे.केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर बंदी आणल्याने त्याचा थेट परिणाम गेले दोन दिवस दरावर दिसत आहे. घाऊक बाजारात कांदा आठ ते २४ रुपये किलोपर्यंत राहिला आहे. निर्यातीबाबतच्या धोरणावर कांद्याचा दर भविष्यात अवलंबून राहणार आहे.वेफर्सच्या बटाटा ४८ रुपयेकमी पाण्याचा बटाटा वेफर्ससाठी वापरला जातो. कोल्ड स्टोअरेजमध्ये त्याची तशा प्रकारे साठवणूक केली जात असल्याने त्याचा दर नियमित बटाट्यापेक्षा अधिक असतो. सध्या तो ४८ रुपये किलो आहे.
पावसामुळे नेमका बटाटा किती खराब झाला, याचा अंदाज येत नसल्याने दरात थोडी वाढ झाली आहे. मात्र येत्या तीन-चार दिवसांत नवीन बटाट्याची आवक सुरू होईल.- मनोहर चूग, अध्यक्ष, कांदा-बटाटा असोसिएशन, कोल्हापूर