प्रवीण देसाई ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : डफावर थाप मारत शाहिरी पोवाड्यातून गेल्या पाच वर्षांपूर्वी शिवाजी पेठेतील शिवशाहीर दिलीप सावंत व सहकाऱ्यांनी शाहू विचारांच्या जागराला सुरुवात केली आहे. यंदाही राजर्षी शाहू जयंतीनिमित्त ते मंगळवारी (दि. २५) शाहिरी पोवाडा सादरीकरण करणार आहेत.शाहू जयंतीनिमित्त व्याख्यानमालेबरोबर शाहिरांचा कार्यक्रम व्हावा, अशी इच्छा दिलीप सावंत यांनी राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांच्याकडे व्यक्त केली. तसेच पवार यांच्या घरी काही पोवाड्याची कवणे सादर केली. ती ऐकून संबंधितांच्या पाठीवर कौतुकाने थाप देत या कार्यक्रमासाठी होकार दिला. त्यासाठी तत्कालीन जिल्हा पुरवठा अधिकार व स्मारकचे सचिव संजय शिंदे यांचे पाठबळ व स्मारकचे व्यवस्थापक कृष्णाजी हरुगडे, त्यामुळे २०१४ साली राजर्षी शाहू जयंतीनिमित्त ‘शाहूरायांना शाहिरी मुजरा’ या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला.शाहिरांचा वारसा कायमराजर्षी शाहू महाराजांनी अनेक कलांबरोबरच शाहिरी कलेला राजाश्रय दिला. त्यावेळी शाहीर विठ्ठल ढोणे, शाहीर लहरी हैदर यांच्याबरोबरच कलगी- तुरेवाले यांसारखे शाहिरी फड उदयास आले. पुढे ही परंपरा शाहीर तिलक, शाहीर विशारद पिराजीराव सरनाईक, शाहीर शार्दूल भाऊसो पाटील, श्रीपती लोखंडे यांनी रुजविली. त्यानंतर राजाराम जगताप, रमजान बागणीकर, शाहीर कुंतिनाथ करके, मारुती कुंभार, आदी ते अलीकडच्या काळातील शाहिरांपर्यंत चांगलीच बहरली.नवीन कलावंतांना प्रवाहात आणण्याचे ध्येयखºया अर्थाने ही कला आपल्यापुरती मर्यादित न ठेवता नवीन कलावंत घडवून त्यांच्या माध्यमातून शाहू विचारांचा जागर व्हावा यासाठी दिलीप सावंत यांची धडपड आहे. त्यांनी आपल्या कन्या बाल शाहीर दीप्ती व तृप्ती यांना या शाहिरीच्या प्रवाहात आणले. तसेच ग्रामीणमधील लोककलावंतांना तज्ज्ञ अभ्यासकांकडून शाहू महाराजांच्या जीवन कार्याची माहिती देऊन त्यांच्याकडून शाहू विचारांचा जागर केला जात आहे. सावंत यांनी अनुभवी शाहिरांच्या बरोबर नवीन कलावंतांना संधी देऊन त्यांनी शाहू जयंतीनिमित्त शाहू स्मारक सभागृहात शाहिरी मुजºयाची सुरुवात केली. दिवसेंदिवस ही शाहरी बहरत गेली. शाहूप्रेमींनीही त्याला चांगली दाद दिली.शाहूरायांना शाहिरीमुजरा मंगळवारीशाहू जयंतीनिमित्त मंगळवारी (दि. २५) सायंकाळी सहा वाजता शाहूरायांना शाहिरी मुजरा कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यामध्ये शाहीर बजरंग आंबी (सांगली), शाहीर समाधान कांबळे, शाहीर रत्नाकर कांबळे, शाहीर शंकरराव पाटील सहभागी होणार आहेत.
पोवाड्यातून शाहूंच्या विचारांचा जागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2019 12:32 AM