शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
3
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
4
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
5
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
6
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
7
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
8
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
9
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
10
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
11
TATA IPL Auction 2025 Live: व्यंकटेश अय्यरवर कोलकाताचा मोठा सट्टा; २३.७५ कोटींना घेतले विकत
12
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
13
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
14
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
15
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
16
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
18
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
19
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
20
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात

वीजनिर्मितीचा प्रकल्प दहा महिन्यांत

By admin | Published: April 23, 2016 1:19 AM

स्थायी समिती सभा : सभा वेळेत सुरू न झाल्याने अजित ठाणेकर यांचा बहिष्कार

कोल्हापूर : शहरातून गोळा होणाऱ्या दैनंदिन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे काम पुढील दहा महिन्यांत पूर्ण करून घेण्यात येईल, अशी माहिती शुक्रवारी स्थायी समिती सभेत महानगरपालिका प्रशासनातर्फे देण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. सभा वेळेत सुरू झाली नाही म्हणून भाजपच्या अजित ठाणेकर यांनी कामकाजावर बहिष्कार टाकला. गेल्या अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कचऱ्यापासून वीजनिर्मिती प्रकल्पाचे काय झाले, याची माहिती सत्यजित कदम यांनी प्रशासनास विचारली होती. त्याला अनुसरून ही माहिती देण्यात आली. ठेकेदार कंपनीस प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कंपनीला कर्जासाठी लागणारे रजिस्ट्रेशन लिज अग्रीमेंट आदी कागदपत्रे हवी आहेत त्याची प्रक्रिया सुरू आहे. प्रकल्पावर मे अखेर सिव्हीलचे काम सुरू होईल, असेही यावेळी सांगण्यात आले. आर. ई. इन्फ्राच्या कामाबाबत भरपूर तक्रारी आहेत. त्यांची कोणतीही बिले त्यांच्या कामाची तपासणी झाल्याशिवाय अदा करू नयेत, अशी सूचना मेहजबीन सुभेदार, सत्यजित कदम यांनी केली. ठेकेदारास दि. १७ मेपर्यंत कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. नगरोत्थानमधील ठेकेदारांनी कामे मुदतीत पूर्ण न केल्यास ती कामे सबलिड करून इतर ठेकेदारांना देण्यात येतील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. पाटणकर हायस्कूल व टाकाळा येथील प्रकल्पाचे काय झाले? निविदा मंजूर होऊन दोन वर्षे झाली, ठेकेदाराने अद्याप महापालिकेला बयाणा रक्कम भरलेली नाही. ठेकेदार काम करणार नाही, त्यात महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याची तक्रार जयश्री चव्हाण यांनी केली. त्यावेळी ठेकेदारास अंतिम नोटीस काढली आहे. लवकरच त्याच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले. यावेळी सुनील पाटील, रुपाराणी निकम, दीपा मगदूम, रिना कांबळे, आदींनी भाग घेतला.