शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

कर्नाटकातील मठांमधून मिळणार सत्तेचा कौल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2019 12:37 AM

पोपट पवार । लोकमत न्यूज नेटवर्क बंगळुरु : अध्यात्माची शिकवण देत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या कर्नाटकातील ...

पोपट पवार ।लोकमत न्यूज नेटवर्कबंगळुरु : अध्यात्माची शिकवण देत शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या कर्नाटकातील मठांमधूनच आता राजकीय वारे वाहू लागल्याने यंदाच्या लोकसभेचा कौल या मठांच्या राजकीय भूमिकेवरच ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, अध्यात्माच्या या केंद्रांमधून राजकीय दिशा ठरू लागल्याने सर्वच पक्षांचे नेते मठाधिपतींच्या चरणी लीन होत असल्याचे चित्र आहे.तब्बल ११ हजारांपेक्षा अधिक छोटे-मोठे मठ असलेल्या कर्नाटकातील राजकारणात मठांची भूमिका नेहमीच महत्त्वाची मानली जाते. कर्नाटकातील काही मठ याआधी राजकीय आखाड्यापासून दूर राहणे पसंत करीत होते. मात्र, जातीय समीकरणे आणि अनुयायांच्या दबावामुळे अनेक मठांनी अध्यात्माला राजकीय जोड देण्याचा प्रयत्न सुरू केल्याने हे मठ राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहेत. कर्नाटकात लिंगायत आणि वक्कलिंग समाजाची मोठी लोकसंख्या आहे. हे दोन्ही समाज पूर्वापार अध्यात्माशी जोडले गेले असल्याने कर्नाटकातील प्रत्येक खेड्यात या समाजाशी निगडित मठ विखुरले आहेत. राज्यात १९ टक्के लिंगायत समाज असून, या समाजाचे सर्वाधिक मठ आहेत. त्यामुळे हा समाज सत्तेच्या सारीपाठात नेहमीच निर्णायक राहिला आहे. सिद्धगंगा मठ हे या समाजाचे सर्वाेच्च स्थान. त्यामुळे कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी या मठाची पायधूळ झाडत लिंगायत समाजाच्या पाठिंब्यासाठी साकडे घातले होते. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनीही तत्कालीन मठाधिपतींची भेट घेत पाठिंबा मागितला होता. या लोकसभा निवडणुकीतही तुमकूरमधील या मठाचा निर्णय काँग्रस-जेडीएस आणि भाजपसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. अर्थात, नेहमी भाजपच्या पाठीमागे राहणारा हा मठ यंदा कोणत्या पक्षाची सोबत करणार याची उत्सुकता आहे. दुसरीकडे चित्रदुर्ग जिल्ह्यातील श्रीगेरी आणि मुरुगा मठांच्या कौलामुळे जिल्ह्याची राजकीय दिशा बदलत असल्याने येथेही या मठांचा ‘प्रसाद’ मिळविण्यासाठी नेत्यांनी धडपड सुरू केली आहे. लिंगायत समाजाला स्वतंत्र दर्जा देण्याच्या काँग्रेसच्या निर्णयाला या मठाने पाठिंबा दिल्याने या मठाचे अनुयायी काँग्रेसकडे झुकण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे, दलित समाजातील मडिगांचे श्रद्धेय स्थान असलेला मदारा गुरू पीठ हा मठही याच जिल्ह्यात असून, दलित मतांच्या बेगमीसाठी सर्वच पक्षांच्या नजरा या मठावर खिळल्या आहेत. तर मंड्या जिल्ह्यातील आदिचुंचनगिरी मठाचा वक्कलिंग समाज सर्वांत मोठा अनुयायी आहे. १३-१४ टक्के लोकसंख्या असलेला हा समाज कर्नाटकच्या राजकारणातील महत्त्वाचा घटक आहे. या समाजाशी निगडित असणाऱ्या मठ आणि मठाधिपतींची भूमिका निर्णायक असते. इतिहासाला उजाळा दिल्यास या मठाने आतापर्यंत जेडीएस आणि काँग्रेसच्या पारड्यात आपले माप टाकले आहे.मोठ्या मठांचा राज्यभर प्रभाव...राज्यात लिंगायत समाजाचे जवळपास ४००हून अधिक मठ आहेत. तुमकुरचा सिध्दगंगा मठ, चिकमंगलूरचा श्रृगेंरी मठ आणि हुबळी येथील मठाचे अनुयायी काही लाखांच्या घरात असल्याने या मठातील मठाधिपतींनी घेतलेल्या राजकीय निर्णयाचे पडसाद संपूर्ण राज्यभर पडत असतात. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीत जवळपास २२१ लिंगायत मठांनी काँग्रेसला उघड उघड पाठिंबा दर्शविला होता. त्यामुळे भाजपची व्होट बँक असलेला लिंगायत समाज अनेक भागात काँग्रेसकडे वळल्याचे दिसून आले होते.