राजाराम पाटील ।इचलकरंजी : वस्त्रोद्योग साखळीतील उत्पादक घटक नुकसानीत आणि दलाल, व्यापारी तेजीत, अशा विचित्र परिस्थितीमुळे महाराष्टतील शेती खालोखाल रोजगार देणारा यंत्रमाग उद्योग अडचणीत आला आहे. याचा परिणाम म्हणून यंत्रमाग उद्योगातील ५० टक्क्यांहून अधिक कापड उत्पादन घटले आहे. आर्थिक मंदी असली तरी तिचा सर्वाधिक फटका यंत्रमाग उद्योगाला बसत असून, शासनाची उदासिनता हेही प्रमुख कारण आहे.
देशातील वस्त्रोद्योगात असलेल्या २३ लाख यंत्रमागांपैकी सुमारे बारा लाख यंत्रमाग महाराष्टÑात आहेत. मात्र, गेल्या चार वर्षांपासून कापडाला नसलेल्या मागणीमुळे यंत्रमाग उद्योग अडचणीत आहे. जून २०१६ पासून आर्थिक मंदीची तीव्रता वाढत चालली आहे. त्याला कापूस बाजारात होणारी सट्टेबाजी कारणीभूत आहे. त्याचा परिणाम म्हणून सुताच्या भावात अस्थिरता निर्माण झाली आहे.
केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री स्मृती इराणी यांनी वस्त्रोद्योगातील अडीअडचणी समजून घेण्यासाठी एक बैठक नवी दिल्लीत बोलावली. बैठकीत वस्त्रोद्योगातील प्रतिनिधी आणि आमदार व खासदारांचा समावेश होता. प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींनी समस्या आणि त्यावरील उपाययोजना मांडल्या. सूतगिरण्यांसाठी लागणाऱ्या कापसाचे भाव स्थिर राहावेत, सुताचे दर किमान महिनाभर समान दराने मिळावेत, परदेशातून स्वस्त भावाने आयात होणाºया कापडावर (चिंधी) निर्बंध आणावेत, साध्या यंत्रमागांसाठी पोषक असे धोरण जाहीर करावे, अशा मागण्यांवर तीन-चार आठवड्यांत निर्णय घेण्याचे आश्वासन देणाºया वस्त्रोद्योगमंत्र्यांनी अद्यापपर्यंत काहीही केले नाही.महाराष्टÑात असलेले बारा लाख यंत्रमाग विकेंद्रित क्षेत्रामधील इचलकरंजी, भिवंडी, मालेगाव, माधवनगर-सांगली, विटा, वसमत, येवला अशा केंद्रांमध्ये आहेत. या उद्योगात गेली चार वर्षे असलेली आर्थिक मंदी, नोटाबंदी आणि जीएसटीनंतरची चलन टंचाई, त्याचबरोबर सरकारचे असलेले दुर्लक्ष अशा कारणांमुळे यंत्रमाग उद्योग मोडकळीला आला आहे. या उद्योगाची अवस्था आणि त्याची मिमांसा करणारी वृत्तमालिका आजपासून...यंत्रमाग : नुकसानीतील उद्योगकापड उत्पादनासाठी लागणारे सूत यंत्रमागधारकास रोखीने घ्यावे लागते. वीज बिल, कामगार पगार, अन्य खर्च रोखीनेच करावा लागतो. याउलट कापड मात्र उधारीवर विकले जाते. त्यासाठी मिळणारे पेमेंट, जे पूर्वी आठ-दहा दिवसांत मिळत असे, ते आता चलन टंचाईमुळे साठ ते सत्तर दिवसांनी मिळू लागले आहे. सध्या तरी पेमेंटची खात्री राहिली नाही. कारण नुकसानीतील उद्योग म्हणून यंत्रमाग उद्योगाकडे पाहिले जात आहे, असे मत यंत्रमागधारक शंकर पुजारी यांनी व्यक्त केले.
अन्यथा २५ टक्के यंत्रमाग भंगारातयंत्रमाग उद्योगासाठी लागणाºया चढ्या दराची वीज, सूत, कामगार वेतन यामुळे कापड उत्पादन खर्चात वाढ झाली. मात्र, कापडास किफायतशीर दर मिळत नसल्याने यंत्रमागधारक तोट्यात गेला आहे. त्यांच्याकडील भांडवल आता संपल्याने सरकारच्या आर्थिक मदतीचे पॅकेज मिळाले, तरच दिवाळीनंतर पुन्हा यंत्रमाग सुरू होतील. अन्यथा, सुमारे २५ टक्के यंत्रमाग कारखाने कायमचे बंद होऊन भंगारात जातील, अशी परखड प्रतिक्रिया इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशनचे अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी दिली.