शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

आठ हजार जणांचे अर्ज; पण बाराशेंनाच सूर्यघर; कोल्हापूर-सांगलीतील चित्र 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2024 5:18 PM

केंद्र शासन देणार ७८ हजारांचे अनुदान

कोल्हापूर : कोल्हापूर, सांगलीत प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ८ हजार १७ घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले आहेत. या योजनेतून अद्यापपर्यंत १२०६ घरगुती ग्राहकांनी ४३३९ किलोवॉट क्षमतेचे छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारले आहेत. या योजनेतून तीन किलोवॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पासाठी केंद्र शासनाकडून ७८ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येणार आहे. या योजनेचा घरगुती ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे महावितरणचे आवाहन आहे.या योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी https://pmsuryaghar.gov.in या राष्ट्रीय पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करणे गरजेचे आहे. पीएम सूर्यघर नावाचे मोबाइल ॲपही यासाठी उपलब्ध आहे. घराच्या छतावर सौर प्रकल्प बसवून वीजनिर्मिती करायची व त्याद्वारे घराची विजेची गरज पूर्ण करायची, अशी ही योजना आहे. वापराइतकी सौर वीजनिर्मिती झाल्यास वीजबिल शून्य येते अर्थात वीज मोफत मिळते.अधिकची निर्माण झालेली वीज महावितरणला विकून उत्पन्नही मिळते. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत सौर प्रकल्पासाठी २ किलोवॉट क्षमतेपर्यंत प्रतिकिलोवॉटला ३० हजार रुपये, तर तिसऱ्या किलोवॉटला १८ हजार रुपये अनुदान मिळेल. अर्थात १ किलोवॉटसाठी ३० हजार रुपये, २ किलोवॉटसाठी ६० हजार रुपये व ३ किलोवॉटसाठी ७८ हजार रुपये अनुदान केंद्र शासनाकडून थेट मिळेल. १३ फेब्रुवारी २०२४ नंतर अर्ज दाखल केलेल्या ग्राहकांना केंद्र शासनाकडून नव्या दराने अनुदान मिळेल.

कुणाला कितीची गरज ?एक किलोवॉट क्षमतेच्या सौर प्रकल्पाद्वारे वार्षिक सरासरीने मासिक सुमारे १२० युनिट वीजनिर्मिती होते. मासिक १५० युनिटपर्यंत वीजवापर असणाऱ्या कुटुंबाला २ किलोवॉट, तर मासिक १५० ते ३०० युनिट वीजवापर असणाऱ्या कुटुंबासाठी ३ किलोवॉट क्षमतेची सौर यंत्रणा पुरेशी ठरते.

कोल्हापूर : ९४८ ग्राहककोल्हापूर जिल्ह्यात ४७४७ घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून ९४८ ग्राहकांनी योजनेतून ३४४४ किलोवॉट सौर यंत्रणा बसविली आहे. जिल्ह्यात १ लक्ष ७१ हजार कुटुंबांचे लक्ष्य निर्धारित आहे.

सांगली : २५८ ग्राहकसांगली जिल्ह्यात ३२७० घरगुती ग्राहकांनी अर्ज दाखल केले असून २५८ ग्राहकांनी योजनेतून ८९५ किलोवॉट सौर यंत्रणा बसविली आहे. जिल्ह्यात १ लक्ष १४ हजार कुटुंबाचे लक्ष्य निर्धारित आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरSangliसांगलीelectricityवीजHomeसुंदर गृहनियोजन