यवलूज : एनएफबी स्पोर्टस् यांच्यामार्फत मुंबई येथे घेण्यात आलेल्या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये माजगाव- शिंदेवाडी (ता. पन्हाळा) येथील धावपटू प्रदीप बाजीराव शिंदे याने १२ तासांमध्ये १२० किलोमीटर अंतर पूर्ण केले. दिल्ली येथे ७ मार्च रोजी होणाऱ्या मेरेथॉन स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. प्रदीपने प्रजासत्ताकदिनी हाती तिरंगा राष्ट्रध्वज घेऊन ८० किलोमीटर अंतर धावण्याचा विक्रम अवघ्या १० तास ३२ मिनिटांत करून सुवर्णपदक पटकावले होते. तो श्रीपतराव चौगुले आर्टस् अँड सायन्स या महाविद्यालयाचा धावपटू आहे. त्याच्या या यशाबद्दल शिंदेवाडी ग्रामपंचायततर्फे सरपंच श्रीमती सिंधूताई शिंदे यांच्या हस्ते प्रदीपचा सत्कार करण्यात आला.
त्याला ज्ञानगंगा शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. के.एस. चौगुले, संस्था सचिव शिवाजीराव पाटील, सर्व संचालक, प्राचार्य डॉ. श्रीमती व्ही.पी. पाटील, डॉ. बी.एन. रावण, यू.एन. लाड यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : २८ प्रदीप शिंदे