कोल्हापूर : जिल्ह्यात एकाच पोलीस ठाण्यात सलग दोन वर्षे कार्यकाल पूर्ण झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्या करण्यात आल्या. यामध्ये जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांची स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी), तानाजी सावंत यांची जिल्हा विषेश शाखा (एलआयबी) तर शशिराज पाटोळे यांची सायबर सेल शाखेस बदली करण्यात आली आहे.
जिल्ह्यात सलग दोन वर्षे एकाच पोलीस ठाण्यात कार्यकाल पूर्ण केलेल्या पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक यांच्या प्रशासकीय तसेच विनंती बदल्यांचे आदेश पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सोमवारी रात्री उशिरा काढले. एकूण १५ पोलीस निरीक्षक, १४ सहायक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जिल्ह्यांतर्गत करण्यात आल्या. त्यामध्ये प्रशासकीय, विनंती व नव्याने रुजू झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
बदली झालेले अधिकारी पुढीलप्रमाणे :
पोलीस निरीक्षक - प्रमोद जाधव ( जुना राजवाडा ते स्थानिक गुन्हे ), दत्तात्रय नाळे ( कागल ते जुना राजवाडा ), तानाजी सावंत ( स्थानिक गुन्हे ते एलआयबी), दत्तात्रय बोरीगिड्डे (जयसिंगपूर ते शिरोळ), राजेंद्र मस्के (जयसिंगपूर), शशिराज पाटोळे ( एलआयबी ते सायबर सेल ), प्रकाश गायकवाड ( गडहिंग्लज ते आर्थिक गुन्हे शाखा) अंबरुषी फडतरे (पन्हाळा ते मानव संसाधन ).
सहायक पोलीस निरीक्षक - भालाजी भांगे (आजरा ते कुरुंदवाड) दीपक भांडवलकर (गांधीनगर ते शाहूपुरी), किरण भोसले ( शिरोली एमआयडीसी ते स्थानिक गुन्हे, इचलकरंजी), शैलेजा पाटील (पन्हाळा ते शाहूवाडी), भालचंद्र देशमुख (शाहूवाडी ते शिवाजीनगर पो. स्टे.) अरविंद कांबळे (करवीर ते जुना राजवाडा)
जिल्ह्यात नव्याने रुजू झालेले अधिकारी : पोलीस निरीक्षक - राजू ताशिलदार (गावभाग, इचलकरंजी), अप्पासाहेब कोळी (राधानगरी), राजेश गवळी (शाहूपुरी) , सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत पाटील (गडहिंग्लज ).
विनंती बदल्या : पोलीस निरीक्षक - अरविंद काळे (आर्थिक गुन्हे ते पन्हाळा ), ईश्वर ओमासे ( मानव संसाधन ते राजारामपुरी), श्रीकृष्ण कटकधोंड ( शाहूपुरी ते आर्थिक गुन्हे). सहायक पोलीस निरीक्षक - विश्वास पाटील (राधानगरी ते इस्पर्ली ), सत्यराज घुले (स्थानिक गुन्हे ते गांधीनगर), राजेश खाडवे (नियंत्रण कक्ष ते शिरोली एमआयडीसी), शिवानंद कुंभार (शिरोळ ते स्थानिक गुन्हे), सुनील हरुगडे (गडहिंग्लज ते आजरा), अंजना फाळके (नियंत्रण कक्ष ते लक्ष्मीपुरी ), सुरज बनसोडे ( नियंत्रण कक्ष ते करवीर), श्रद्धा आंबले ( नियंत्रण कक्ष ते महिला कक्ष ).