शहरं
Join us  
Trending Stories
1
ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
2
आजचे राशीभविष्य : स्त्री वर्गाकडून विशेष लाभ होईल, धनप्राप्तीसाठी आजचा दिवस अनुकूल
3
मुंबईत काँग्रेसचे ४ अल्पसंख्याक उमेदवार; पहिल्या यादीत अस्लम शेख, अमीन पटेल आदींची नावे
4
मंगल प्रभात लोढा यांची संपत्ती ४३६ कोटी! पाच वर्षांत ठाकरे, आव्हाडांची संपत्ती कितीने वाढली?
5
बारामतीत अजित पवार विरुद्ध युगेंद्र पवार काका-पुतण्या लढत; गडचिरोलीत वडील विरुद्ध मुलगी
6
बडे नेते, कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सर्वांनीच केले शक्तिप्रदर्शन; अर्जासाठी साधला मुहूर्त
7
एलओसीजवळ दहशतवादी हल्ला, दाेन जवान शहीद; जम्मूत पुन्हा भ्याड कृत्य; दाेन हमालही ठार
8
महायुतीत २७८ जागांवर ठरले; आता १० जागांचाच तिढा! अमित शाहांसोबतच्या बैठकीत निर्णय
9
काँग्रेसने २५ विद्यमान आमदारांना पुन्हा दिली उमेदवारीची संधी; ४८ जणांची पहिली यादी जाहीर
10
घड्याळ वापरा, पण अटही पाळा; अजित पवार गटाला सर्वोच्च न्यायालयाच्या कानपिचक्या
11
महायुती सरकारला धडा शिकविण्याची हीच खरी वेळ; विनेश फोगाट यांचा महायुतीवर घणाघात
12
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
13
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
14
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
15
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
16
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
17
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
18
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
19
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
20
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला

कोल्हापूरच्या प्रणवचा फ्रीस्टाईल फुटबॉलवर जागतिक विक्रम, यापूर्वी बांगलादेशच्या महमुदुलच्या नावावर होती नोंद 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 11:30 AM

प्रणव गेल्या दोन वर्षांपासून हा विक्रम मोडण्याचा करत होता सराव

वडणगे : येथील प्रणव अशोक भोपळे याने फ्रीस्टाईल फुटबॉलवर आणखी एका जागतिक विक्रमाची नोंद केली. त्याच्या नावावर हा तिसरा जागतिक विक्रम नोंदविला गेला असून, या नोंदीचे प्रमाणपत्र प्रणवला नुकतेच प्राप्त झाले. यापूर्वी बांगलादेशच्या महमुदुल हसन फैसल याच्या नावावर या जागतिक विक्रमाची नोंद होती. त्याने एका मिनिटामध्ये १३४ वेळा हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरविला होता. प्रणवने एका मिनिटामध्ये १४६ वेळा हातावरून छातीवर गोल आकारामध्ये फुटबॉल फिरवून नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.या रेकॉर्डचे प्रात्यक्षिक त्याने २५ डिसेंबर २०२२ रोजी दिले होते. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डकडून मिळालेल्या मार्गदर्शनानुसार अधिकृत साक्षीदार म्हणून क्रीडाशिक्षक रवींद्र पाटील यांनी, तसेच टाईमकिपर म्हणून वडणगे फुटबॉल क्लबचे कोच अशोक चौगले यांनी काम पाहिले.प्रणव गेल्या दोन वर्षांपासून हा विक्रम मोडण्याचा सराव करत होता. त्यासोबतच करिअर म्हणून जोपासलेल्या फ्रिस्टाइल फुटबॉल या खेळाचा सराव व नवनवीन तंत्रे आत्मसात करीत आहे. त्याला आई प्रतिभा भोपळे, वडील अशोक भोपळे, मोठा भाऊ अजिंक्य भोपळे, मामा सुधीर चिकोडे, तसेच वडणगे फुटबॉल क्लबचे अध्यक्ष रविराज मोरे, प्रवीण जाधव, सर्व खेळाडू, क्रीडा शिक्षक रघुनाथ पाटील, रगेडियन जिमचे फिटनेस कोच विनायक सुतार, अभिजित पाटील, ऋषिकेश ठमके यांचे मार्गदर्शन लाभले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरFootballफुटबॉल