डॉ. खिलारी पुढे म्हणाले, तालुक्यातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. झटपट निदान झाल्यास उपचार होण्यासाठी नागरिकांनी घाबरून न जाता कोरोनाची तपासणी करून घ्यावी. खासगी डॉक्टरांच्याकडेही उपचार घेणार्या रुग्णांची संख्या मोठी असून कोरोनासदृश लक्षणे आढळल्यास अशा रुग्णांची आठवडाभराची यादी खासगी डॉक्टरांनी आरोग्य विभागाकडे त्वरित द्यावी, तसेच यापुढे दैनंदिन यादी देण्याच्या सूचनाही दिल्या.
खासगी लॅबमध्ये कोरोनाची रॅपिड अॅन्टिजन टेस्ट करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी डॉ. राजीव चव्हाण यांनी केली असता, यासाठी लॅबधारकांनी आरोग्य विभागाकडे रितसर परवानगीची मागणी करावी, या टेस्टसाठी केवळ ४०० रुपये शुल्क आकारण्याची परवानगी देण्यात आली.
यावेळी डॉ. महेश भोसले, डॉ. रुक्साना शिकलगार यांनी रुग्ण तपासणीवेळी येणार्या अडचणी मांडल्या.
या बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. एस. बी. यत्नाळकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. भगवान डवरी, डॉ. किरण यादव, डॉ. वैभव करवळ, डॉ. सुशांत पाटील, डॉ. श्वेता गिरी, दीपक गोंजारी, प्रशांत माळी, मनोज देसाई आदी उपस्थित होते.