कोल्हापूर : गोकूळ दूध संघाच्या निवडणुकीत विरोधी आघाडीतून आपल्याला संधी मिळावी यासाठी बिद्री कारखान्याचे संचालक प्रवीण पाटील हे आग्रही आहेत. सोमवारी दुपारी त्यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची त्यासंदर्भात भेट घेतली.
गोकूळ परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून गेली चार वर्षे ते सक्रिय आहेत. त्यांचे ज्येष्ठ बंधू रणजित पाटील हे विद्यमान संचालक असल्याने सत्तारूढ आघाडीचे उमेदवार आहेत. बिद्री कारखान्याच्या माध्यमातून कागलसह भूदरगड, राधानगरी तालुक्यांत त्यांचा चांगला संपर्क आहे. त्यामुळे त्या माध्यमातून रणजित पाटील यांचा नक्की पराभूत करू शकतो, असा विश्वास त्यांना वाटतो. त्यांच्या उमेदवारीचा निर्णय मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हातात आहे. त्यामुळे त्यांना विचारल्याशिवाय राष्ट्रवादीच्या कोणत्याच उमेदवाराने निवडणूक अर्ज भरू नये, असे धोरण निश्चित करण्यात आले आहे.