कोल्हापूर : कळंबा (ता. करवीर) येथील खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल केल्यानंतर तब्बल अडीच तास उपचार न मिळाल्याने नऊ महिने पूर्ण झालेल्या गर्भवती मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. आम्ही मुलीस मुहूर्तावर प्रसूतीसाठी दाखल केले, अशी डॉ. वैशाली पाटील खोटी माहिती देऊन स्वत:ला वाचविण्याचा प्रयत्न करत आहेत. मुलगी राजश्री गिरीश पोवार (वय ३२, रा. आम्रपाली अपार्टमेंट, अंबाई टँक, रंकाळा) हिच्या मृत्यूस त्याच जबाबदार असल्याची तक्रार करवीर पोलीस ठाण्यात दिल्याची माहिती वडील राजाराम दत्तात्रय पाटील (रा. सोन्यामारुती चौक, कोल्हापूर) यांनी दिली.
कळंबा येथील अंकुर रुग्णालयात प्रसूतीसाठी राजश्री पोवार यांना सोमवारी (दि. १०) सकाळी ९ वाजता दाखल केले. यावेळी डॉ. वैशाली पाटील यांना फोन करून रुग्णाला त्रास होत असून लवकर या, असा निरोप दिला. त्या ११.३० वाजता रुग्णालयात आल्या. तब्बल अडीच तास राजश्री यांच्यावर कसलेही उपचार झाले नाही. त्या जमिनीवर कोसळून बेशुद्ध झाल्या. त्यानंतर डॉ. पाटील यांनी घाईगडबडीने जावयांच्याच कारमधून राजश्री यांना ‘सीपीआर’मध्ये आणले.
याठिकाणी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे येथील डॉक्टरांनी सांगितले. त्या गर्भवती असल्यापासून वेळेवर त्यांची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात नेले जात होते. प्रसूतीसाठी कोणताही मुहूर्त पाहिलेला नव्हता. डॉ. पाटील या स्वत:च्या बचावासाठी खोटी माहिती सांगत आहेत. त्यांनी वेळेवर उपचार न केल्याने राजश्रीचा मृत्यू झाला. त्यांच्याविरोधात राजश्रीचा भाऊ संदीप पाटील यांनी फिर्याद दिली.
वेळेची छाननी सुरुकरवीर पोलिसांनी बुधवारी दिवसभर डॉ. पाटील यांच्यासह त्यांच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची चौकशी करून कागदपत्रांची तपासणी केली. डॉ. पाटील यांना नातेवाइकांनी केलेले फोन, त्यानंतर त्या किती वाजता रुग्णालयात आल्या. रुग्ण किती वाजता दाखल झाला. यासंबंधीचे काही जबाबही कर्मचाºयांकडून घेतले. पोलीस ‘सीपीआर’च्या वैद्यकीय समितीच्या अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.
मृत राजश्री पोवार यांचे शवविच्छेदन सीपीआरमध्ये झाले. व्हिसेरा राखून ठेवल्याने मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नाही. त्यासाठी तिघा डॉक्टरांची समिती नियुक्त केली आहे. त्यांच्या अहवालानंतरडॉ. वैशाली पाटील दोषी असल्याचे स्पष्ट झाल्यास गुन्हा दाखल करू- अरविंद कांबळे , करवीरचे सहायक पोलीस निरीक्षक