कोल्हापूर : मुसळधार पावसामुळे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली की शहरातील सखल भागांत पाणी येते. शाहूपुरी कुंभार गल्ली, दसरा चौकातील सुतारवाडा या ठिकाणी जयंती नाल्यातून पुराचे पाणी येऊन जनजीवन विस्कळीत होते. पूरपरिस्थितीपूर्वी काय उपाययोजना करता येतील, काही समस्या आहेत काय, याची पाहणी करण्यासाठी रविवारी पहाटे सहाच्या सुमारास महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी रस्त्यावर उतरले.
मॉर्निंग वॉकच्या वेळेत त्यांनी जवाहरनगर रेणुका मंदिरपासून संभाजी पूल ते खानविलकर पेट्रोल पंपापर्यंत जयंती नाल्याची पाहणी केली. त्यांच्यासोबत दोन अधिकारी होते. नजरेसमोर आलेल्या समस्यांची तत्काळ अंमलबजावणी करून दुरुस्तीचे आदेश त्यांनी यावेळी दिले.एकेकाळी धार्मिक अधिष्ठान लाभलेली जयंती नदी आणि सध्यस्थितीत फक्त लोकप्रतिनिधींच्या उदासीनता, दुर्लक्ष, अतिक्रमणामुळे नदीचे स्वरूप मोठ्या नाल्यात झाले. पावसाळ्यापूर्वी यंदा महानगरपालिकेमार्फत लोकसहभागातून नालेसफाई म्हणजेच नाल्याला नदीचे पूर्ववत स्वरूप प्राप्त करून देण्याची संकल्पना महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी हाती घेतली.
रामानंदनगर, हॉकी स्टेडिअम, सावित्रीबाई फुले रुग्णालय, लक्ष्मीपुरी, आयर्विन ब्रिज ते खानविलकर पेट्रोलपंपानजीक पंप हाऊसपर्यंत या जयंती नाल्याच्या दोन्ही काठांवरील कचरा, प्लास्टिक, पाण्यातील गाळ काढून हे पाणी प्रवाहित ठेवले.मुसळधार पावसामुळे पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडली की शहरातील जयंती नाला परिसरातील सखल भागांत पाणी येते. शाहूपुरी कुंभार गल्ली, दसरा चौकातील सुतारवाडा या ठिकाणी पुराचे पाणी येऊन जनजीवन विस्कळीत होते. परिस्थिती उद्भवण्यापूर्वी त्याची पाहणी करण्यासाठी रविवारी पहाटे आयुक्त डॉ. कलशेट्टी रस्त्यावर उतरले.
मॉर्निंग वॉकच्या वेळेत त्यांनी जवाहरनगर रेणुका मंदिरपासून ते खानविलकर पेट्रोलपंपापर्यंत जयंती नाल्याची पाहणी केली. पहाटे रस्त्यावर उतरलेल्या आयुक्तांना पाहून अनेक अतिक्रमणधारकांनी धास्ती घेतली.सेल्फी पॉर्इंटलक्ष्मीपुरीतील विल्सन पुल, कोंडाओळ येथील पुलाची पाहणी डॉ. कलशेट्टी यांनी केली. कोंडाओळ येथील पुलावर जयंती नाल्याला पूर आला की पाण्याची पातळी मोठी दिसते. या ठिकाणी पूरपरिस्थिती पाहण्यासाठी लोकांची गर्दी असते; त्यामुळे या पुलावर सेल्फी पॉर्इंट करण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाचे आहे.