कोल्हापूर : कोरोनाचा धोका आजच्याघडीला कोल्हापूर जिल्ह्यात पूर्णत: नियंत्रणात असला तरी अन्य जिल्ह्यांतील अनुभव पाहता तो कधीही वाढू शकतो, त्यावेळी तारांबळ उडू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने आणखी तब्बल ५४० बेडची तयारी केली आहे. रुग्ण सापडला की त्याच्या सानिध्यात आलेल्यांना संस्थात्मक विलगीकरण करावे लागते. त्याचा विचार करून हे नियोजन केले आहे.
सध्या नऊ विलगीकरण केंद्रात ५१२ बेडची व्यवस्था आहे. आणखी तीन वसतिगृहात २४० ची सोय केली आहे.आवश्यकता भासल्यास केआयटी कॉलेज येथेही ३०० बेड तयार करण्याचा विचार सुरू आहे. याची जबाबदारी पाटबंधारे विभागाकडे देण्यात आली आहे. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या ११ वर गेली आहे. परंतू त्यातील चौघे कोरोनामुक्त झाले आहेत. इचलकरंजीचा रुग्ण वगळता अन्य कोरोना बाधीत रुग्णांची प्रकृतीही चांगली आहे. जे रुग्ण सध्या सापडले आहेत, त्यांची पार्श्वभूमी अन्य शहरातील प्रवासाची आहे.
जिल्हा प्रशासनाने लॉकडाऊनची अंमलबजावणी कडक केली आहे. त्याचा परिणाम म्हणून रुग्णसंख्या व सामुहिक संसर्ग रोखणे शक्य झाले आहे. परंतू सातारा,सोलापूर आदी शहरात अगोदर अगदीच कमी रुग्णसंख्या होती ती अचानक वाढल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. तसे घडू नये यासाठी ही सगळी व्यवस्था करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संभाजी माने व उपअभियंता धनंजय भोसले यांच्या देखरेखीखाली हे काम सुरू आहे.कोल्हापुरातील सध्याची विलगीकरण केंद्रे : ०९ - एकूण क्षमता ५१२कृषी महाविद्यालय मुलांचे वसतिगृह : २०० बेड,मराठा वसतिगृह (इमारत क्रमांक १, सदर बझार) : ६० बेड,मराठा वसतिगृह (इमारत क्रमांक २) : ५८,अल्पसंख्याक मुलींचे वसतिगृह (राजाराम कॉलेज): ५०,शासकीय तंत्रनिकेतन मुलांचे वसतिगृह : ३४,अंडी उबवणी केंद्र (कसबा बावडा रोड) : ४०,कुटुंब कल्याण केंद्र (शेंडा पार्क) : ४६,वैद्यकीय महाविद्यालय (बी विंग, शेंडा पार्क) : २४पर्यायी व्यवस्थान्यू कॉलेजचे वसतिगृह : १५० बेड,कसबा बावडा रोडवरील माजी सैनिक मुलींचे वसतिगृह : ५० बेडशिवाजी विद्यापीठ येथे ४० बेड