या अभियानांतर्गत पर्यावरण रक्षणाची शपथ दिली. छत्रपती शिवाजी महाराज संकुल परिसर येथे पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचतत्त्वांचे संरक्षण व संवर्धन करण्यासाठी आम्ही पन्हाळकर कटिबद्ध आहोत, याबाबत पथनाट्य सादर केले. तीन दरवाजा परिसर येथे ओला कचरा, सुका कचरा आणि घरगुती घातक कचरा वर्गीकरण करून देण्याबाबत पथनाट्य सादर केले. यावेळी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेच्या सन्माननीय नगराध्यक्षा रूपाली रवींद्र धडेल, मुख्याधिकारी स्वरूप खारगे, नगरसेवक दिनकर भोपळे, नगरसेविका सुरेखा पर्वतगोसावी, सामाजिक कार्यकर्ते तैय्यब मुजावर, रवींद्र धडेल, मंदार नायकवडी, शैलेंद्र लाड तसेच नगरपरिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर पथनाट्याकरिता शहरातील नागरिक व पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेमार्फत ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२१’ची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 4:23 AM