भरत शास्त्री-- बाहुबली --लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांमध्ये अन्य राज्याच्या तुलनेत राज्यातील विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. या उद्देशाने राज्य सरकार शिक्षण विभागाच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी शालेय स्तरावर स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केंद्र निर्माण करणार आहे.शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षांची तयारी व्हावी. अधिकाधिक विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य सरकारकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये सहभागी होऊन यश संपादन करावे, हा या मागचा हेतू आहे. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचे प्रमाण कमी असल्याने एमपीएससी, यूपीएससी, आयएएस, आयपीएस, आदी स्पर्धा परीक्षांची माहिती शालेय स्तरावरून देण्यात येणार आहे. दहावी आणि बारावीतील मुले या मार्गदर्शन केंद्रांमुळे स्पर्धा परीक्षांकडे वळतील, अशी आशा सरकारला आहे.हे मार्गदर्शन केंद्र माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत असणार असून, राज्यातील सर्व माध्यमिक शिक्षण विभागांना असे केंद्र शालेय स्तरावर स्थापन करण्याची सूचना देण्यात आली आहे. यासाठी राज्य शासनाने अल बोगिरवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती.या समितीतील तज्ज्ञांनी नागरी सेवा परीक्षांबाबत विद्यार्थ्यांमध्ये असणारा न्यूनगंड, परीक्षेची काठिण्य पातळी, गैरसमज, माहितीचा अभाव यामुळे हुशार विद्यार्थी स्पर्धा परीक्षांकडे पाठ फिरवितात, असे निरीक्षण मांडले आहे. त्यामुळेच या समितीच्या शिफारशीनुसार विद्यार्थ्यांना शालेय स्तरावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण संस्थेची मदतदेखील घेण्यात येणार आहे. ही बाब उल्लेखनीय आहे. या केंद्रांतर्गत विद्यार्थ्यांसाठी शिबिरांचे आयोजन करणे, ग्रामीण भागातील शिक्षकांना माहिती देऊन त्यांना प्रेरित करणे, जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांना आमंत्रित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अशा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंदांमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्वाधिक फायदा होणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासून स्पर्धा परीक्षेची ओळख होऊन त्याची भीती देखील निघून जाण्यास मदत होईल.गोमटेश बेडगे, मुख्याध्यापक, एम. जी. शहा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज, बाहुबली.केंद्राची रूपरेखाशिक्षकच मुलांना मार्गदर्शन करणारगरजेनुसार जिल्ह्यातील यशस्वी अधिकारी मार्गदर्शन करणारस्पर्धा परीक्षेची भीती, न्यूनगंड व गैरसमज दूर करण्यासाठी मदत होणारसर्वाधिक लाभ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना
शालेय स्तरावरच होणार स्पर्धा परीक्षेची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 11:57 PM