* जि. प. ची मॉडेल शाळा बनविण्याचा मानस
शुभम गायकवाड : उदगांव उदगांव (ता. शिरोळ) येथील जिल्हा परिषदेच्या देसाई विद्यामंदिराला १८ डिसेंबरला दीडशे वर्षे पूर्ण होणार आहेत. त्यामुळे माजी विद्यार्थी, तरुण वर्ग व ड्रीम फौंडेशनच्या माध्यमातून जिल्हा परिषदेची मॉडेल शाळा बनविण्याचा मानस आहे. त्याबाबत वार्षिक आराखडा तयार करण्यात आला असून वर्षभर वेगवेगळ्या उपक्रमांनी शतकोत्तर सुवर्ण कार्यक्रम करण्यात येणार आहे. शतकोत्तर सुवर्ण महोत्सवानिमित्त वृक्षारोपण, जमीन सपाटीकरण करणे यासह शाळेच्या पूर्ण जागेचा बांधकाम व वार्षिक कार्यक्रमाचा आराखडा फलकाचे उद्घाटन होणार आहे. तसेच दीडशे दिवे लावून तत्कालीन परिस्थितीमध्येही विद्यार्थ्यांसाठी व गावाच्या विकासासाठी झटणाऱ्या नागरिकांना आदरांजली वाहण्यात येणार आहे.
---------------
चौकट
- शताब्दी महोत्सवाला मांदियाळी
या शाळेची स्थापना अठरा डिसेंबर १८७० रोजी संस्थापक दादासाहेब देसाई यांच्या नेतृत्वाखाली झाली. १९७० चा शताब्दी महोत्सव तत्कालीन शिक्षणमंत्री मधुकरराव चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झाला होता तर शाळेत एका कार्यक्रमानिमित्त उपपंतप्रधान मोरारजी देसाईही आले होते. त्यामुळे या कार्यक्रमाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे.
चौकट -
असे आहे नियोजन
* शाळेचे डिजिटलायझेशन
* शाहू, फुले, आंबेडकर यांचे स्मृतिस्थळ
* संस्थापक दादासाहेब देसाई यांचा अर्धाकृती पुतळा
* बालसाहित्य संमेलन
* पारंपरिक खेळांची प्रात्यक्षिके
* गावचा इतिहास असणारी स्मरणिका प्रकाशन
* सुसज्ज क्रीडांगण
* चारही बाजूंनी आकर्षक वॉल पेंटिंग
* सुसज्ज ग्रंथालय
कोट - १८७० च्या तत्कालीन गुलामगिरीच्या परिस्थितीतही गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी ही शाळा उभी केली आहे. त्या काळातील काही मोजक्याच शाळा आता शिल्लक आहेत. त्यामुळे हा अमूल्य ठेवा जपण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करू.
- सागर कदम, संस्थापक, ड्रीम फौंडेशन.
फोटो - १५१२२०२०-जेएवाय-०६-उदगांव येथील देसाई विद्यामंदिर शाळा