शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एक देश, एक निवडणूक’ला मंजुरी; कोविंद समितीच्या शिफारशीनुसार प्रस्तावावर मंत्रिमंडळाची माेहाेर
2
ईदला लाउडस्पीकर लावणे हानिकारक : हायकाेर्ट, न्यायालयाने याचिका निकाली काढली
3
महिला मुख्यमंत्रीवरुन राजकीय चर्चा जोरात; वर्षा गायकवाड यांच्या विधानानंतर मविआत वेगवेगळी मते
4
दिल्लीच्या नव्या हेडमिस्ट्रेस, दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणाऱ्या तिसऱ्या महिला
5
राहुल गांधींच्या जिभेला चटके द्या; भाजप खासदार अनिल बोंडेंचे वक्तव्य, फौजदारी गुन्हा दाखल
6
गडकरी दिल्लीत सगळ्यांना आवडतात; ते का?
7
आतिशी शनिवारी घेणार मुख्यमंत्रिपदाची शपथ ? केजरीवालांचा राजीनामा राष्ट्रपतींकडे पाठवला
8
आतापासूनच करा मुलांच्या पेन्शनची सोय; ‘एनपीएस वात्सल्य’ योजनेला सुरुवात
9
महामुंबईत गणरायाला भावपूर्ण निरोप, पुढच्या वर्षी लवकर येण्याची भक्तांची गळ
10
मुंबई विमानतळावर एक कोटीचे सोने जप्त; पाच विमानतळ कर्मचाऱ्यांना अटक
11
मुंबई-पुणे ‘एक्सप्रेस वे’वर वाटमारी, पाच अटकेत; तीन फरार; पनवेल पोलिसांची कारवाई
12
नवी मुंबईतील १२ हजार कोटींच्या सेमी कंडक्टर प्रकल्पाचे उद्घाटन, उद्योजकांना त्रास दिल्यास तुरुंगात टाकू : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
13
रेल्वे अधिकाऱ्याची नऊ लाखांची फसवणूक; गैरव्यवहारात अटक करण्याची भीती दाखवून फसवले
14
शासकीय रुग्णालयांत आता सौर ऊर्जेचा उजेड; वैद्यकीय शिक्षण विभागाची मंजुरी
15
लेबनॉन पेजर स्फोटानंतर हिजबुल्लाह संतापले; इस्रायलवर शेकडो रॉकेट डागले
16
Glenn Phillips Dhananjaya de Silva Video, SL vs NZ 1st Test: खतरनाक स्पिन! टप्पा पडून चेंडू वळला अन् काहीही कळण्याआधीच 'दांडी गुल'
17
मनोज जरांगेंना लक्ष्मण हाकेंचे जशास तसे प्रत्युत्तर; वडीगोद्री येथे उपोषण सुरु करणार!
18
मध्य प्रदेशात मोठा अपघात! सात जणांचा मृत्यू; दहा जण जखमी, अंगावर काटा आणणारे दृश्य
19
India vs Bangladesh 1st Test Free Live Streaming: फुकटात पाहता येणार भारत-बांग्लादेश पहिली कसोटी, पण कुठे? वाचा सविस्तर
20
पाण्यासाठी पाकिस्तान तरसणार, भारताने पाठविली नोटीस; सिंधू वाटप करार बदलणार

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघासाठी भाजपमध्येच रस्सीखेच, मोर्चेबांधणी सुरु

By विश्वास पाटील | Published: July 09, 2024 7:33 PM

महाडिक, जाधव, चिकोडे, कदम यांच्यात रस्सीखेच

विश्वास पाटीलकोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून भाजपची उमेदवारी मिळावी म्हणून कृष्णराज महाडिक, राहुल चिकोडे, महेश जाधव आणि सत्यजित कदम यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. महायुतीत हा मतदारसंघ नेमका कोणत्या पक्षाच्या वाट्याला जातो हे अजून स्पष्ट नाही, परंतु भाजपच्याच वाट्याला मतदारसंघ येणार, असे गृहित धरून मोर्चेबांधणी सुरू झाली आहे.या मतदारसंघात मागील २० वर्षांत दोन टर्म शिवसेनेला मिळाल्या आणि दोन वेळा काँग्रेसचा विजय झाला. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसचे खासदार शाहू छत्रपती यांना या मतदारसंघाने १३८०८ इतके मताधिक्य दिले. त्यामुळे काँग्रेसचा उमेदवार कोण असणार हे विचारात घेऊन भाजप आपला उमेदवार निश्चित करणार हे स्पष्टच आहे. गेल्या २०१९ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चंद्रकांत जाधव यांनी तत्कालीन आमदार व नियोजन मंडळाचे आताचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा १५,१९९ मतांनी पराभव केला.पुढे २०२१ ला आमदार जाधव यांचे निधन झाल्यावर लगेच झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या भाजपच्या सत्यजित कदम यांचा १९,२१० मतांनी पराभव करून विजयी झाल्या. पोटनिवडणुकीत शिवसेना काँग्रेससोबत होती. परंतु, नंतर महाराष्ट्रात सत्तांतर झाले आणि एकनाथ शिंदे भाजपसोबत गेले. मूळची ही जागा शिवसेनेची असताना पोटनिवडणुकीत ती भाजपकडे गेली. भाजपचाही पराभवच झाला असल्याने आता या जागेवर नेमका हक्क कुणाचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.विधानसभेच्या २०१४ च्या निवडणुकीत जेव्हा भाजप-शिवसेना स्वतंत्र लढली तेव्हा शिवसेनेने भाजपचा पराभव केला होता, हा एक बेस आहे. पण, आता भाजपची ताकद वाढली असून शिवसेना दुभंगली आहे. त्यामुळे भाजप जास्त आक्रमक आहे.

संभाव्य इच्छुक असे..

  • भाजपकडून कृष्णराज महाडिक यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करून रिंगणात उतरणार असल्याचे जाहीर केले आहे. खासदार धनंजय महाडिक यांनीही त्याच्या उमेदवारीचे समर्थन केले आहे. त्यामुळे तो प्रबळ दावेदार ठरू शकतो. महाडिक यांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी खूप जवळचे संबंध आहेत. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाच्याही जवळ आहेत. कृष्णराज याचे व्यक्तिमत्व तरुणाईला भुरळ घालणारे आहे. सोबत महाडिक गटाची ताकद आहे. या जमेच्या बाजू विचारात घेऊन ते पुढे निघाले आहेत. महाडिक कुटुंबियांशी संबंधित सत्यजित कदम यांचे काय होणार किंवा शेजारच्या कोल्हापूर दक्षिणमधून शौमिका महाडिक रिंगणात उतरणार असल्याने घराणेशाहीची टीका होणार हे गृहित धरून ते पावले टाकत आहेत, असे दिसते.
  • महेश जाधव किंवा राहुल चिकोडे हे भाजपमधील मंत्री चंद्रकांत पाटील गटाचे म्हणजेच मूळच्या भाजपचे उमेदवार म्हणून तयारी करत आहेत. आम्ही अजून किती दिवस दुसऱ्याच्या पालख्या वाहायच्या, असा विचार करून हा गटही आता आक्रमक होऊ लागला आहे. आम्ही निष्ठावंत आहोत, त्यामुळे आमचाच उमेदवारीवर हक्क आहे असे त्यांना वाटते. स्वतः मंत्री पाटील यांनी तयारीला लागा असे आपल्याला सांगितले असल्याचे चिकोडे सांगत आहेत. ते स्वतः मंत्री पाटील यांनी उभ्या केलेल्या संस्थांशी जोडून आहेत. उमेदवार म्हणून मर्यादा, नेटवर्कचा अभाव असला तरी एकदा पक्ष पाठीशी असल्यावर आम्ही लढत देऊ शकतो, असे या दोघांनाही वाटते. भाजपच्या मूळच्या कार्यकर्त्यांना बाजूला करून नको त्यांना जवळ केल्याने लोकसभेला दणका बसला आहे. तसे पुन्हा नको असेल तर निष्ठावंत कार्यकर्त्याला संधी द्या, अशी मांडणी हा गट करत आहे.
  • सत्यजित कदम यांनीही मतदारसंघात सगळीकडे लोकोपयोगी कामाचे फलक लावून आपणच भाजपचे उमेदवार असू, असे जाहीर केले आहे. ते एकदा काँग्रेसकडून आणि एकदा भाजपकडून पराभूत झाले आहेत. त्यामुळे त्यांना अजून किती वेळा संधी देणार, असाही मुद्दा चर्चेत आणला जात आहे. तसे घडलेच तर पर्याय तयार असावा म्हणून कृष्णराज यांची घोषणा महाडिक गटाने करून ठेवली आहे. पोटनिवडणुकीत कदम यांनी जरूर चांगली लढत दिली, परंतु त्यानंतर त्यांनी आपल्यातील दोष दूर करून आपणच या मतदारसंघातील हमखास जिंकणारा उमेदवार आहे, असा विश्वास ते निर्माण करू शकलेले नाहीत. संपर्क वाढवला आहे किंवा कोल्हापूरच्या प्रश्नांना ते भिडलेत, असेही कुठे दिसत नाही. पोटनिवडणुकीत त्यांना अगदी सहज उमेदवारी मिळाली होती. तसे चित्र आता नक्कीच नाही.
टॅग्स :kolhapurकोल्हापूरvidhan sabhaविधानसभाBJPभाजपा