शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर; धनंजय मुंडेंविरोधात 'या' नेत्याला संधी...
2
नवाब मलिकांच्या मुलीविरोधात शरद पवारांची मोठी खेळी; अभिनेत्रीच्या पतीला दिली उमेदवारी
3
निकालानंतर गरज पडली, तर पवारांची मदत घेणार की उद्धव ठाकरेंची?; फडणवीसांनी काय दिले उत्तर?
4
विधानसभा निवडणुकीत भाजपा किती जागा जिंकेल? आकड्याबाबत देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान
5
Vidhan Sabha Election : विधानसभा उमेदवारीचा अर्ज किती पानांचा असतो? खर्च किती येतो?; जाणून घ्या सर्व माहिती
6
बांगलादेशी हिंदूंचा जीव धोक्यात! "नोकरी सोडा अन्यथा...", कट्टरतावाद्यांकडून दिल्या जातायत धमक्या 
7
भाजप कोणत्या विद्यमान आमदारांची तिकिटं कापणार? देवेंद्र फडणवीसांचं पहिल्यांदाच भाष्य
8
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
9
घाबरण्याची गरज नाही...डिजिटल अरेस्टबाबत पीएम मोदींनी केले जागरुक; सांगितले तीन टप्पे
10
Pushpa 2: १००-२०० नाही तर तब्बल इतके कोटी, 'पुष्पा २'साठी अल्लू अर्जुनने घेतलं तगडं मानधन
11
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
12
'मन की बात' मध्ये पंतप्रधान मोदींनी केला छोटा भीम, मोटू-पतलू अन् हनुमानाचा उल्लेख; काय म्हाणाले?
13
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
14
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
15
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
16
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
17
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
18
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
19
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
20
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप

Navratri2023: जोतिबा मंदिरातील नवरात्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 2:18 PM

खंडेनवमीदिवशी चार महिन्यांनंतर जोतिबाच्या पालखी सोहळ्याला पुन्हा सुरुवात होणार

अमोल शिंगे जोतिबा: अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्र उत्सवानिमित्त दख्खनचा राजा श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावरील सर्व मंदिरांमध्ये नवरात्रोत्सवाची प्रशासन, देवस्थान समिती आणि पुजारी वर्गाच्यावतीने संपूर्ण तयारी सूरू असून ती अंतिम टप्प्यात आली आहे. या नऊ दिवसांत जोतिबा मंदिरामध्ये विविध धार्मिक विधी संपन्न होणार आहेत. महाराष्ट्र कर्नाटक गुजरात आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील शारदीय नवरात्र उत्सव येत्या 15 ऑक्टोंबर पासून 24 ऑक्टोंबर पर्यंत होणार असून त्यानिमित्त जोतिबा मंदिरासह इतर सर्व परिसरात तयारी सुरु आहे. जोतिबा डोंगरावरील सर्वच मंदिरात रविवारी घटस्थापना होणार आहे. यावेळी सर्व ग्रामदैवतांची शोभयात्रेच्या स्वरूपात घटस्थापना होणार आहे. चार महिन्यांनंतर पालखी सोहळ्याला पुन्हा सुरुवात होणारघटस्थापना झाल्यानंतर नऊ दिवस श्री जोतिबाची कमळपुष्पाती पुजा बांधण्यात येईल. नवरात्रातील सातव्या दिवशी म्हणजेच शनिवार दिनांक 21 रोजी जागर संपन्न होणार आहे. सोमवार दिनांक 23 रोजी खंडेनवमी होणार असून याच दिवशी चार महिन्यांनंतर जोतिबाच्या पालखी सोहळ्याला पुन्हा सुरुवात होणार आहे. मंगळवार दिनांक 24 रोजी विजयादशमीचा सोहळा संपन्न होईल. भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सुविधादरम्यान देवस्थान समितीच्या वतीने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नवरात्र उत्सव काळात पंधरा लाख भाविक डोंगरावर येतील त्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही कॅमेरे, सुरक्षारक्षक, भाविकांना सुलभ दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांग, पिण्याच्या पाण्याची सोय, मंदिर परिसरात आकर्षक विद्यूत रोषणाई करण्याचे काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने संपूर्ण तयारी सूरू असून ती अंतिम टप्प्यात आली असल्याचे जोतिबा देवस्थान समितीचे व्यवस्थापक धैर्यशील तिवले यांनी सांगितले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरNavratriनवरात्रीJyotiba Templeजोतिबा