कोल्हापूर : शहरात व्हॅलेंटाईन डेची तयारी जोरात सुरू झाली आहे. आतापासूनच युवक-युवतींकडून भेटवस्तू देण्यासाठी बाजारपेठेत लगबग सुरू झाली आहे. राजारामपुरी, महाद्वार रोड, आदी ठिकाणच्या गिफ्ट शॉपीच्या दुकानांत खरेदीसाठी उत्साही वातावरण आहे.
मनातील प्रेम व्यक्त करण्याचा किंवा प्रिय व्यक्तींना प्रेमाची नव्याने जाणीव करून देण्याचा व्हॅलेंटाईन डे हा दिवस आहे. दरवर्षी १४ फेब्रुवारी रोजी हा दिवस साजरा केला जातो. कोल्हापुरामध्ये गेल्या चार दिवसांपासून युवक, युवतींसह अनेकजण हा साजरा करण्यासाठी नियोजन करीत आहेत. प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देण्यासाठी बाजारपेठेत खरेदीला गर्दी होत आहे. महाविद्यालयातील काही वर्ग अद्यापही बंद असले तरी तेथील विद्यार्थ्यांनीही व्हॅलेंटाईन डे साजरा करण्याचा निर्धार केला आहे.
चौकट
चॉकलेट, किचन, कपल शो पीस, ज्वेलरी, परफ्युम्स, हार्ट पिलो खरेदीसाठी मागणी जास्त आहे. कोरोना अथवा महाविद्यालयांना जरी सुट्टी असली तरी मागील वर्षाच्या तुलनेपेक्षा गिफ्ट खरेदीला अधिक उत्साह आहे. सध्या व्हॅलेंटाईन डे वीक साजरा केला जात असून ७ फेब्रुवारीपासून खरेदीसाठी शॉपीमध्ये गर्दी होत असल्याची माहिती टायटस गॅलरीचे बंटी पिंजाणी यांनी दिली.
फोटो : ११०२२०२१ कोल व्हॅलेंटाईन डे
ओळी : कोल्हापुरात व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तयारी जोरात सुरू आहे. गिफ्ट शॉपीमध्येही आकर्षक भेटवस्तू ठेवण्यात आल्या असून खरेदीसाठी उत्साही वातावरण आहे.
छाया : आदित्य वेल्हाळ