शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
5
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
6
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
7
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
8
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
9
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
10
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
11
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
12
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
13
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
14
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
15
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
16
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
17
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
18
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
19
"एकनाथ शिंदेंना उपमुख्यमंत्री व्हायचं नसेल, तर..."; रामदास आठवलेंनी सांगितला तोडगा
20
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?

भाजप सहकारातील शिरकावासाठी सज्ज

By admin | Published: November 02, 2014 10:47 PM

चंद्रकांतदादांना मंत्रिपद : राज्य बॅँकेसह ‘गोकुळ’, जिल्हा बॅँकांवर लक्ष

कोल्हापूर : चंद्रकांतदादा पाटील यांना सहकार मंत्रिपद मिळाल्याने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारात भाजपचा शिरकाव होणार असल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. राज्य सहकारी बॅँकेसह जिल्हा बॅँका, ‘गोकुळ’ या संस्थांमध्ये भाजपचे वजन राहणार, हे निश्चित असल्याने पाटील यांच्या मंत्रिपदाने पक्षाच्या कार्यकर्त्यांना आगामी काळात बळ मिळणार आहे. सहकार व कॉँग्रेस-राष्ट्रवादी कॉँग्रेस हे समीकरण गेली अनेक वर्षे महाराष्ट्राच्या राजकारणात पाहावयास मिळाले. त्याला कारणेही तशीच आहेत. साडेचार वर्षांचा अपवाद वगळता राज्यात कॉँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता राहिली आहे. त्यामुळे सहकारी संस्थांवर त्यांचेच प्रभुत्व राहिले आहे. काही अपवाद वगळता एकाही बड्या सहकारी संस्थेत भाजपच्या कार्यकर्त्याला संधी मिळालेली नाही. आता राज्यात भाजपची सत्ता आल्याने कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. त्यात चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडे सहकार, पणन, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देऊन भाजपने सहकाराचे जाळे असणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रात आपली पाळेमुळे घट्ट करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. मंत्री पाटील यांच्या रूपाने कोल्हापूरला तिसऱ्यांदा सहकार मंत्रिपद मिळत आहे. यापूर्वी ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील यांनी १९७८ मध्ये ‘पुलोद’ सरकारमध्ये सहकारमंत्री म्हणून काम केले होते. या काळात त्यांनी खऱ्या अर्थाने या खात्याला न्याय मिळवून दिला. कापूस एकाधिकार योजना, गूळ, सोयाबीनच्या खरेदीत थेट बाजार समित्यांना उतरवून व्यापाऱ्यांना सरळ करण्याचे काम प्रा. पाटील यांनी केले होते. त्यानंतर १९९९ ला कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमध्ये सहकार राज्यमंत्री म्हणून स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांना संधी मिळाली होती. त्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांना सहकारमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर सध्या जिल्ह्यातील सर्वच संस्थांवर कॉँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व आहे. ‘गोकुळ,’ जिल्हा बॅँक, बाजार समिती, साखर कारखाने येथे भाजपचा एकही कार्यकर्ता संचालक म्हणून कार्यरत नाही. त्यामुळे येथून पुढे या संस्थांमध्ये भाजप कार्यकर्त्यांचा शिरकाव होणार, हे निश्चित आहे. मंत्री पाटील यांच्या माध्यमातून भाजपच्या कार्यकर्त्यांना बळ मिळाले आहे. (प्रतिनिधी)कोल्हापूर जिल्ह्याचे आतापर्यंतचे मंत्री (कॅबिनेट)रत्नाप्पाण्णा कुंभार (काँग्रेस)प्रा. एन. डी. पाटील (पुलोद)जयवंतराव आवळे (काँग्रेस)प्रकाश आवाडे (काँग्रेस)दिग्विजय खानविलकर (राष्ट्रवादी)विनय कोरे (जनसुराज्य)हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी) चंद्रकांतदादा पाटील (भाजप)फडणवीस यांचे सूतोवाच खरे ठरलेआगामी मंत्रिमंडळात राज्याचा सहकारमंत्री हा कोणत्याही साखर कारखाना, दूध संघाशी संबंधित आमदार असणार नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्याप्रमाणे चंद्रकांतदादा पाटील यांच्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देऊन फडणवीस यांनी आपले सूतोवाच खरे केले. सहकारमंत्रीच पुन्हा पालकमंत्री?गेल्या पाच वर्षांत आघाडी सरकारमध्ये माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील हेच कोल्हापूरचे पालकमंत्री होते. आता हे खाते चंद्रकांतदादा पाटील यांना मिळाले आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांतदादा पाटील यांचीच वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोल्हापूरला सहकारमंत्रीच पुन्हा पालकमंत्री म्हणून मिळणार आहे.