शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
2
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
3
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
4
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
5
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
6
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
7
TATA IPL Auction 2025 Live: भारतीय खेळाडूंचा लिलावात बोलबाला; पंत, अय्यर अन् चहल यांच्यावर पैशांचा पाऊस
8
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
9
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर
10
IPL Auction 2025: इतिहास घडला! श्रेयस अय्यर ठरला सर्वात महागडा खेळाडू! पंजाब किंग्जने मारली बाजी
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 :'बाज की असली उड़ान बाकी है'; मुख्यमंत्रि‍पदाच्या चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीसांचा व्हिडीओ व्हायरल
12
"इतका लीड घेतला की पेट्या कमी पडल्या"; विक्रमी मताधिक्यानंतर धनंजय मुंडेंचे फडणवीसांकडून कौतुक
13
ज्या पार्टीचा एकच आमदार जिंकला; तोही म्हणाला, राजीनामा देणार!
14
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
15
IPL Auction 2025 : प्रीतीनं हाणून पाडला काव्या मारन यांचा डाव; अर्शदीप RTM सह १८ कोटींसह पुन्हा PBKS च्या ताफ्यात
16
IPL 2025 Auction : नेहरानं हेरला Jos Buttler चा चेहरा; GT च्या संघानं लगेच पर्समधून काढली एवढ्या कोटींची रक्कम
17
संभलमध्ये मशिदीच्या सर्व्हेदरम्यान हिंसाचार, जाळपोळ, दगडफेक, २ जणांचा मृत्यू 
18
"संजय राऊत वेडे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे’’, शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली
19
भयंकर! इन्स्टावर मैत्री, बॉयफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी ५ वर्षांच्या लेकीचा काढला काटा अन्...

भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकण्याची यादी तयार

By admin | Published: April 23, 2016 1:31 AM

चंद्रकांतदादा पाटील : व्हनाळी येथे अन्नपूर्णा पाणी योजनेच्या विस्तारीकरणाचा प्रारंभ

म्हाकवे : आघाडी सरकारच्या काळात अनेक घोटाळे झाले आहेत. पूर्वी या जन्मात केलेले अपकृत्य पुढच्या जन्मात फेडायला येत होते. परंतु या जन्मात केलेले अपकृत्य याच जन्मात फेडायला लागत आहे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छगन भुजबळ हे आहे. सहकारामध्ये भ्रष्टाचार केलेल्यांची यादी तयार असून कोणी कधी तुरुंगात जाणार याची ही तारीख ठरलेली आहे, असा गौप्यस्फोट सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला. व्हनाळी (ता. कागल) येथील अन्नपूर्णा सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या विस्तारीकरण प्रारंभप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात कागलसह जिल्ह्यात अनेक बोगस निराधार लाभार्थी घुसडण्यात आले. त्याची छाननी करून त्यांना कमी करताना आमच्या घरावर मोर्चे काढण्यात आले, परंतु मी घाबरणारा मंत्री नाही. कारण आम्ही कुठल्याही सामान्य माणसाची फसगत न करता या यादीतून धनदांडग्यांनाच वगळले आहे. परिवहनमंत्री दिवाकर रावते म्हणाले, महाराष्ट्रात सर्वत्र दुष्काळाची स्थिती आहे. सर्वत्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. मात्र, संजय घाटगेंसारख्या दूरदृष्टी असणाऱ्या नेत्यामुळे येथील शेतकऱ्यांच्या शेतीलाही मुबलक पाणी मिळत आहे. प्रास्ताविक दत्ताजीराव घाटगे यांनी केले. यावेळी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, माजी आमदार संजय घाटगे, गोकुळचे संचालक अंबरिश घाटगे, आदींची भाषणे झाली.संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाप्रमुख विजय देवणे, शेतकरी संघटनेचे भगवान काटे, गोकुळचे अध्यक्ष विश्वास पाटील, हिंदुराव शेळके, माजी आमदार दिनकरराव जाधव, बजरंग देसाई, संग्रामसिंह कुपेकर, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संभाजी भोकरे, वीरेंद्र मंडलिक, राजेखान जमादार, आदी प्रमुख उपस्थित होते. (प्रतिनिधी)सहकारमंत्र्यांच्या घरात गडी राहतोचंद्रकांतदादा पाटील यांनी मुश्रीफांचे सर्व घोटाळे बाहेर काढले तर दादांचे जोडेही उचलण्यासाठी तयार आहोत. साखर कारखान्यात १० टनांची ८ टन पावती देऊन शेतकऱ्यांची लूट सुरूआहे. १० टन उसाबरोबर १० टनाची पावती घोरपडे कारखान्यातून मिळाली तर सहकारमंत्र्यांच्या घरात मी गडी राहतो, असे आवाहनही माजी उपाध्यक्ष दत्ताजीराव घाटगे यांनी केले. आता ऊस गाळपाचा विचार करूसंजय घाटगे यांनी ‘अन्नपृूर्णा’च्या माध्यमातून ओसाड डोंगरमाथ्यावर एक लाख टन ऊस निर्माण केला आहे. आता हा तयार होणारा ऊस याच ठिकाणी गाळप होण्यासाठी प्रयत्न करू. त्यासाठी आवश्यकता पडली तर सहकार कायद्यात बदल करु पण घाटगे यांना ऊस गाळप परवाना मिळवून देऊ, असा शब्दही पाटील यांनी दिला.