नागपूर : राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या विमानासमोर आठ डुकरे आल्याच्या गंभीर प्रकरणाची चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए) आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांनी बुधवारी केली. याबाबतचा अहवाल डीजीसीए गुरुवारी नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सोपविणार असल्याची माहिती आहे. डीजीसीएच्या पश्चिम क्षेत्राचे (मुंबई) सहायक संचालक ब्राह्मणे आणि एएआयच्या पश्चिम विभागाचे महाव्यवस्थापक चीम सोम यांनी बुधवार सकाळपासूनच चौकशी सुरू केली. ब्राह्मणे यांनी धावपट्टी आणि सीमेच्या आतील परिसराची पाहणी केली. मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) कार्यान्वयन विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. यासह त्यांनी भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या (एएआय) अधिकाऱ्यांचीही कसून चौकशी केल्याचे सांगण्यात आले.
‘डीजीसीए’ अधिकाऱ्याचा अहवाल तयार
By admin | Published: September 17, 2015 1:15 AM