कोल्हापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आमदार पी. एन. पाटील यांनी चिरंजीव राहुल यांच्यासाठीचा आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे या निवडीतील उत्सुकता आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीकडून युवराज पाटील हे प्रमुख दावेदार असून, जयवंतराव शिंपी यांनीही मुंबईपर्यंत जावून प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.युवराज पाटील हे गोकुळसाठी इच्छूक होते; मात्र त्यांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा शब्द देण्यात आल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे आता पुन्हा शब्द बदलण्यासाठी मुश्रीफ तयार नाहीत. राज्याचा आपण ग्रामविकास मंत्री असताना आपल्याच एका ज्येष्ठ सहकाऱ्याला हे पद देण्यासाठी मुश्रीफांनी जोडण्या लावल्या आहेत. त्यामुळे शेवटच्या टप्प्यात ते बदल करण्यास राजी नाहीत. म्हणूनच त्यांनी दहा दिवसांपूर्वीच पत्रकार परिषदेत अध्यक्ष राष्ट्रवादीचाच होणार, असे जाहीर करून टाकले होते.सर्वात आधी तीन महिन्यांपूर्वीच पी. एन. यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन राहुल यांना अध्यक्षपदाची संधी मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. राहुल पाटील यांनी गेल्या आठवड्यात जिल्हा बँकेत मुश्रीफ यांची तर अजिंक्यतारावर सतेज पाटील यांची भेट घेतली होती; मात्र अर्ध्या तासातच मुश्रीफ यांनी अध्यक्ष राष्ट्रवादीचा असेल, अशी घोषणा केल्याने युवराज पाटील यांचे नाव चर्चेत आले. सतेज पाटील यांनीही कॉंग्रेसने अध्यक्षपदावरील दावा सोडला नसल्याचे स्पष्ट केल्याने आणखी संभ्रम वाढला.शुक्रवारच्या बैठकीला पी. एन. शेवटच्या टप्प्यात आले. सदस्यांशी चर्चा झाल्यानंतर सर्व नेतेमंडळी मुश्रीफ यांच्या दालनामध्ये गेली; परंतु तेथे फारशी चर्चा झाली नसल्याचे समजते. त्यामुळे तेथून पी. एन. लगेचच बाहेर पडले.पी.एन, राजू शेट्टी यांची भेटशासकीय विश्रामगृहावरील बैठकीनंतर शाहूपुरीतील श्रीपतरावदादा बँकेत पी. एन. आणि राजू शेट्टी यांच्यात चर्चा झाली. या दोघांच्या भेटीमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.पी.एन., मुश्रीफ, सतेज पाटील यांच्यात बैठकीची शक्यतागोकुळच्या निवडणुकीमुळे जरी सतेज आणि पी. एन. एकमेकांविरोधात लढले असले तरी सतेज यांनी पी. एन. यांच्यावर एकाही शब्दाने टीका केली नाही. त्यामुळेच राहुल यांना अध्यक्षपद मिळावे, यासाठी पी. एन. यांनी शुक्रवारी सायंकाळी सतेज यांच्याशी फोनवरून चर्चा केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे शनिवारी किंवा अगदीच शक्य झाले नाही तर पन्हाळ्यावर रविवारी मुश्रीफ, सतेज पाटील आणि पी. एन. यांच्यात बैठक होण्याची शक्यता आहे.भाबडी आशाराहुल पाटील यांच्या नावासाठी ११ सदस्य आग्रही आहेत. याचा विचार दोन्ही मंत्र्यांनी करावा. हीच संधी असल्याने काहीही करून राहुल यांना पद मिळावे, यासाठी पी. एन. यांच्यावर कार्यकर्त्यांनी दबाव वाढवला आहे. जिल्हा बँक निवडणुकीचा विचार करून मुश्रीफ कदाचित फेरविचार करतील, अशी भाबडी आशा पी. एन. पाटील समर्थक बाळगून आहेत.
अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 11:33 AM
Zp Kolhapur : कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले तरी आमदार पी. एन. पाटील यांनी चिरंजीव राहुल यांच्यासाठीचा आग्रह कायम ठेवला आहे. त्यामुळे या निवडीतील उत्सुकता आणखी वाढल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रवादीकडून युवराज पाटील हे प्रमुख दावेदार असून, जयवंतराव शिंपी यांनीही मुंबईपर्यंत जावून प्रयत्न सुरूच ठेवले आहेत.
ठळक मुद्देअध्यक्षपद राष्ट्रवादीकडे, पण पी. एन. यांचा आग्रह कायम युवराज पाटील प्रमुख दावेदार, शिंपीही प्रयत्नशील