शहरं
Join us  
Trending Stories
1
उपमुख्यमंत्रिपद, पक्षाचं प्रमुखपद की केंद्रीय राजकारण...; एकनाथ शिंदेंचं पुढचं पाऊल काय?
2
भाजपच्या अभूतपूर्व यशाचे ‘रहस्य’ काय?; 'सागर' बंगल्यावर पडद्यामागे घडलेल्या गोष्टी
3
महायुती सरकारने वक्फ बोर्डाला १० कोटी निधी केला जाहीर; सरकारी जीआर जारी
4
मुख्यमंत्रि‍पदाचा निर्णय झाला का? बैठकीनंतर एकनाथ शिंदेंनी दिली महत्त्वाची माहिती
5
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी काेण? दिल्ली दरबारी अडीच तास खलबते; २ डिसेंबरला शपथविधी!
6
मशालीमुळे उडाला भडका, आगीचे लोळ उठले, ३० जण होरपळले  
7
देशात सर्वाधिक टोल वसुली कुठल्या राज्यात होते? २४ वर्षात सरकारने किती कमाई केली? गडकरींनी दिली माहिती
8
Stock Market Updates: शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २०० अंकांनी वधारला लाइफ इन्शुरन्स शेअर्स वधारले
9
१५० व्या कसोटीत Joe Root वर ओढावली नामुष्की! WTC मध्ये विराटपेक्षा अधिक वेळा पदरी पडला भोपळा
10
शेख हसीना चिन्मय कृष्ण दास यांच्या समर्थनात उतरल्या; तात्काळ सुटकेची मागणी केली
11
'ट्रम्प परत येताहेत'; बांगलादेशातील हिंदुवरील हल्ल्यांवर मूर यांचे विधान
12
अस्थिर बाजारात गुंतवणूकीची भीती वाटतेय? 'या' ५ पर्यायांचा विचार करा; टेन्शनशिवाय मिळेल प्रॉफिट
13
मुख्यमंत्रिपदाच्या बदल्यात शिंदेंनी गृहमंत्रालयासह एवढ्या मंत्रिपदांची केली मागणी, भाजपाकडून असा प्रतिसाद
14
१ डिसेंबरपासून ५ मोठे बदल होणार; सर्वसामान्यांच्या खिशावर परिणाम होणार, वाचा सविस्तर
15
Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस, काय सांगते तुमची राशी?
16
Tata Sons वर गंभीर आरोप, RBI ला कायदेशीर नोटीस... काय आहे संपूर्ण प्रकरण?
17
उत्तरेतील वारे, महाराष्ट्र गारठला; अनेक शहरांचा पारा आला १५ अंश सेल्सिअसखाली 
18
पदवी अभ्यासक्रम अवधी कमी-जास्त करता येणार; विद्यार्थ्यांसाठी UGC ची नवीन योजना काय?
19
नव्या ‘एलएनजी’ बस मुंबईत धावणार की नाशिकमध्ये?; प्रतिगाडी ५.१५ लाखांचा खर्च अपेक्षित

बांधकाम सभापतींची कामे अध्यक्षांनी थांबवली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 4:17 AM

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी राजीनामा प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. राजीनाम्यासाठी ...

कोल्हापूर जिल्हा परिषदेतील पदाधिकारी राजीनामा प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. राजीनाम्यासाठी तयार नसणारे बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी मंजूर केलेली एक कोटी रुपयांची कामे थांबवण्यासाठी अध्यक्ष बजरंग पाटील यांनी कार्यकारी अभियंत्यांना लेखी पत्रच दिले आहे.

जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलाचा प्रश्न शिवसेनेच्या तिघाही पदाधिकाऱ्यांनी राजीनामे न दिल्याने चिघळला आहे. शिवसेना नेत्यांच्या बैठका सुरू असून, स्वाती सासने आणि प्रवीण यादव यांनी राजीनाम्याची तयारी दर्शवली आहे. मात्र माजी आमदार सत्यजित पाटील यांनी वेगळी भूमिका घेतल्याने बांधकाम सभापती हंबीरराव पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही. जेव्हा सत्यजित पाटील सांगतील तेव्हा राजीनामा देणार, असे ते सांगत असून, त्यांनी राजीनामा दिला की आम्ही दोघेही राजीनामा देतो, अशी भूमिका यादव आणि सासने यांनी घेतली आहे.

या सगळ्यामुळे नव्या पदाधिकाऱ्यांना कालावधी मिळणार आहे. त्यामुळे इच्छुकांनी हंबीरराव पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी काही स्पष्ट सूचना केल्याचे सांगण्यात आले. त्याही पुढे जात आता थेट अध्यक्ष बजरंग पाटील यांनाच कामांचे कार्यारंभ आदेश देऊ नयेत, असे लेखी पत्र दिल्यामुळे आता हे प्रकरण वेगळ्या टप्प्यावर आले आहे. पाटील हे बुधवारी दिवसभर जिल्हा परिषदेत नव्हते. मात्र ते गुरुवारी येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचवेळी त्यांची भूमिका स्पष्ट होणार आहे.

शिवसेना पदाधिकाऱ्यांचे राजीनामा प्रकरण विनाकारण ताणवले जात असल्याने ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि पालकमंत्री सतेज पाटीलदेखील नाराज असल्याचे सांगण्यात येते.