कोल्हापूर : दिल्ली आणि केरळसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यासाठी, तसेच दोषींवर कठोर कारवाई होण्यासाठी ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडून सखोल अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी हिंदू जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी तहसीलदार संतोष कणसे यांना दिले.
या निवेदनात गेल्या काही वर्षांत झालेल्या हिंदूंच्या हत्यांमागील सूत्रधार, यांत सहभागी गुन्हेगार व प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस वा राजकीय नेते यांच्यावर कारवाई व्हावी. या प्रकरणांच्या तपासासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करावा. आवश्यकतेनुसार यासाठी केंद्रीय स्तरावर विशेष समिती स्थापन करण्याची मागणी करण्यात आली. या वेळी शिवसेनेचे करवीर तालुकाप्रमुख राजू यादव, किशोर घाटगे, उदय भोसले, देवराज साहानी, शरद माळी, बाळासाहेब नलवडे, हिंदु एकता आंदोलनचे चंद्रकांत बराले, हिंदू जनजागृती समितीचे डॉ. सुरेश आनंदे, शिवानंद स्वामी, अजिंक्य पाटील उपस्थित होते.