सेनापती कापशी (ता. कागल) येथे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकाविलेल्या सृष्टी कुंदन मोरे व दहावीला उज्ज्वल यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या सत्कारप्रसंगी ते बोलत होते.
सामाजिक कार्यकर्ते उमेश देसाई म्हणाले, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनातच आपले ध्येय निश्चित करावे. एकदा ध्येय निश्चित केल्यानंतर ते साध्य करण्यासाठी पाठलाग करावा. तरच जीवनात यशस्वी होता येते.
यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार गटशिक्षणाधिकारी कमळकर, उमेश देसाई व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सदस्यांच्याहस्ते करण्यात आला. रमेश कदम यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सुनील सूर्यवंशी, उपसरपंच तुकाराम भारमल, गुरुप्रसाद जोशी, सर्व शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व पालक उपस्थित होते.