कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे आज, शनिवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात शिक्षकांच्या विविध २७ संघटनांच्या माध्यमातून सुमारे १५ हजार शिक्षक-शिक्षिका सहभागी होणार आहेत.दि. २७ फेब्रुवारी बदली शासननिर्णयात आवश्यक दुरूस्ती, सुधारणा करून बदल्या मे २०१८ मध्ये कराव्यात. दि. २३ आॅक्टोबरच्या निवडश्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत काढण्यात आलेला आदेश रद्द करावा. शिक्षकांना करावी लागणारी सर्वप्रकारची आॅनलाईन कामे बंद करून केंद्र पातळीवर डेटा एंट्री आॅपरेटरची नेमणूक करावी. नोव्हेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या सर्व प्राथमिक शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. एमएससीआयटी प्रशिक्षणासाठी मार्च २०१८ पर्यंत मुदतवाढ द्यावी, या प्रलंबित मागण्यांकडे सरकार, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे काढण्यात येणार आहे. या मोर्चाला आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलच्या मैदानावरून दुपारी एक वाजता सुरुवात होईल. उमा टॉकीज चौक, बिंदू चौक, शिवाजी चौक, महापालिका चौक, सीपीआर, दसरा चौक, व्हीनस कॉर्नरमार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे येणार आहे.
‘प्राथमिक शिक्षक समन्वय समिती’चा आज कोल्हापूर येथे मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 7:57 PM
कोल्हापूर : विविध प्रलंबित मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीतर्फे आज, शनिवारी दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.
ठळक मुद्देविविध २७ संघटना, १५ हजार शिक्षकांचा सहभाग