आदित्य वेल्हाळकोल्हापूर : वनविभागाच्या सोनतळी येथील जखमी वन्यजीव प्राण्यांच्या उपचार केंद्रातील सावळागोंधळाची वरिष्ठ कार्यालयाने गंभीर दखल घेतली असून, तीन दिवसांत संबंधित प्रकाराचा अहवाल अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षकांनी (वन्यजीव) यांनी मागितला आहे.सोनतळी येथील उपचार केंद्रात येणाऱ्या जखमी प्राण्यांवर उपचार त्यापुढील प्रक्रियेसाठी शासकीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्याची गरज आहे. मात्र हे जोखमीचे काम मानद डॉक्टरांकडून केले जाते, याबाबत लोकमतने सोमवारच्या अंकात सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते.
या वृत्ताची दखल अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) सुनील लिमये यांनी घेतली. हे प्रकरण गंभीर असल्याचे सांगत याबाबतचा सविस्तर अहवाल तीन दिवसांत सादर करण्याची आदेश कोल्हापूर विभागाचे मुख्य वनसंरक्षक क्लेमेंट बेन यांना दिले.वनविभागाच्या कारभारावर प्राणिमित्र संतप्तलोकमतने वनविभागाचा भोंगळ कारभार सर्वांसमोर आणल्यानंतर कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सातारा जिल्ह्यातील प्राणिमित्रांनी आपल्याकडे असणारे यासंदर्भातील पुरावे देण्याची तयारी दाखविल्याने या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर वनविभागाच्या कारभारावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली.सेवाभावी वृत्तीने वनविभागाचे काम प्रामाणिक करत आहे. मी आल्यापासून जखमी प्राण्यांचा बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. तरीही काही मंडळी माझ्याबद्दल षडयंत्र करून बदनामी करत आहेत. माझ्याकडे मनुष्यबळ कमी असून, वनविभागाने त्याची पूर्तता केली तर यापेक्षाही चांगले काम करू, असे मानद डॉक्टरांनी सांगितले.
कोल्हापूर वनविभागाबाबत वृत्त पाहिल्यानंतर प्रथम दर्शनी हे प्रकरण गंभीर असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे तत्काळ कोल्हापूर वनसंरक्षकांना याबाबत अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.-सुनील लिमये,अतिरिक्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) )