शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
महायुतीचे उमेदवार विलास भुमरे गॅलरीतून पडले, हात-पाय फ्रॅक्चर, उपचार सुरु
3
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
4
भयंकर! नर्सने माचिसची काडी पेटवली अन् आग लागली; वॉर्डमध्ये नेमकं काय घडलं?
5
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
6
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
7
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
8
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
9
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
10
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
11
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
12
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
13
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
14
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
15
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
16
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
17
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
18
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
19
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

मुख्याध्यापकांची अर्धनग्नावस्थेत धिंड

By admin | Published: June 16, 2015 1:25 AM

महाबळेश्वरमध्ये तणाव : शाळेत महापुरुषाच्या फोटोची विटंबना झाल्याचा आरोप

महाबळेश्वर : येथील पालिकेच्या प्राथमिक शाळेतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो बंद कपाटात ठेवल्याच्या कारणावरून काही राजकीय कार्यकर्त्यांनी दोन मुख्याध्यापकांना शाई फासली. त्यानंतर कपडे फाडून त्यांची भर बाजारपेठेतून धिंड काढत पोलीस ठाण्यात नेले. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच शहरातील अनेक शिक्षकांनी पोलीस ठाण्यातच ठिय्या आंदोलन सुरू केले. सोमवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी दोन्ही बाजूंच्या तक्रारी घेण्याचे काम महाबळेश्वर पोलीस ठाण्यात सुरू होते. दरम्यान, रात्री उशिरा राष्ट्रवादीचे नगरसेवक कुमार शिंदे यांच्यावर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक बँकेचे संचालक व प्राथमिक शाळा क्रमांक एकचे मुख्याध्यापक संजय ओंबळे यांच्या कार्यालयातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो खराब झाल्याने कपाटात ठेवण्यात आला होता. ही बाब समजल्यानंतर सोमवारी दुपारी काहीजण खात्री करण्यासाठी शाळेत गेले. त्यांनी जातानाच शाईची बाटली सोबत घेतली होती. मुख्याध्यापकांच्या तोंडाला शाई फासून कार्यकर्ते त्याच इमारतीतील शाळा क्रमांक दोनमध्ये गेले. या ठिकाणी फोटोला काचेचे आवरण नसल्याने तेथील मुख्याध्यापक जनार्दन कदम यांच्याही तोंडाला शाई फासली. संतप्त जमावाने दोघांना मारहाण करत एका गाडीत कोंबून पालिकेत नेले. विटंबनेला जबाबदार धरून दोन्ही मुख्याध्यापकांवर कारवाईची मागणी करत पालिकेत ठिय्या आंदोलन सुरू झाले. त्यानंतरदोघांनाही नगराध्यक्षा उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या कार्यालयात आणले. तेथे नगरसेवक कुमार शिंदे, मुख्याधिकारी अधिकारी सचिन पवार, उपनगराध्यक्ष संतोष आखाडे, नगरसेवक संदीप साळुंखे, नगरसेविका सुरेखा आखाडे यांचे पती प्रशांत आखाडे, प्रशासन अधिकारी व्ही. एस. फडतरे यांच्यासह पंधरा ते वीस कार्यकर्ते उपस्थित होते. घटनेची माहिती समजताच शिक्षक व राजकीय कार्यकर्ते पोलीस ठाण्यात जमले. त्यामुळे बाजारपेठेत तणावाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी जमलेल्या शिक्षकांनी या प्रकाराचा निषेध केला. तर याच ठिकाणी कुमार शिंदे व त्यांचे बंधू योगेश शिंदे यांनी ठिय्या मांडला. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत महाबळेश्वर पोलीस ठाण्यात सुरू होते. (प्रतिनिधी)कुमार शिंदेंसह दहाजणांवर गुन्हामहाबळेश्वरमधील दोन मुख्याध्यापकांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक कुमार शिंदे त्यांचे बंधू योगेश शिंदेसह दहा जणांवर महाबळेश्वर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला. दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्याची मागणीपालिकेत दोन्ही शिक्षकांना मारहाण केली. यावेळी शिक्षक गयावया करत होते. त्यांना वाचविण्यासाठी कोणीही आले नाही. यावेळी दोन्ही शिक्षकांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली. याप्रकरणी तपास करण्यासाठी नगराध्यक्षा तोष्णीवाल यांनी पाच जणांची समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला. मात्र, काही राजकीय नेत्यांचे समाधान न झाल्याने दोन्ही मुख्याध्यापकांची कपडे फाडून भरबाजारपेठेतून पोलीस ठाण्यापर्यंत धिंड काढली. यामध्ये बेकायदेशीर जमाव जमवून शासकीय कामात अडथळा आणणे, लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्यावर भादंविसं १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ३५३, ३३२ नुसार गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस निरीक्षक सावंत तपास करत आहेत. रात्री उशिरा दंगापथक दाखल झाले.