कोल्हापूर : मानवाला जी अभिप्रेत असलेली विवेकांनद यांची तत्त्वे सर्वसमावेशक आहेत ती आचरणात आणावी, असे प्रतिपादन धुळे येथील प्रकाश पाठक (सी.ए.) यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. येथील तात्यासाहेब तेंडुलकर स्मृती व्याख्यानमालेत ‘विवेकानंद-सहिष्णू हिंदू धर्म’ या विषयावर ते बोलत होते. श्री महालक्ष्मी को-आॅप. बँक व ब्राह्मण सभा, करवीर मंगलधाम यांच्यावतीने ही व्याख्यानमाला प्रायव्हेट हायस्कूलच्या खुल्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे.प्रकाश पाठक म्हणाले, विवेकानंद यांची ही तत्त्वे स्वातंत्र, समता व बंधूता या त्रिसूत्रींवर आधारित आहेत. पाश्चिमात्य देशातील पिल गेटस यांनीही विवेकांनद यांच्या या त्रिसूत्रीचे अनुकरण केले. तत्त्वे ही अर्थगामी नसावीत, ती मुलगामी असावीत. छोटा-मोठा, कनिष्ठ-वरिष्ठ असे हिंदू धर्मात कोणी नाही. विवेकानंद यांनी सहा वर्षे भारतभ्रमण करताना भगवद्गीता, पुराण, उपनिषिदे, वेद यांचा व व्याकरण, विविध भाषा यांचा सखोल अभ्यास केला. त्यांचा त्यांना जीवनात उपयोग झाला. स्वातंत्र्य, समता हे दोन्ही समतोल ठेवण्यासाठी बंधूता हे महत्त्वाचे आहे. माणसाचा जन्म हा कर्म व कर्मयोगावर आधारित असतो. जो लवचिक असतो, तो सहिष्णू नसतो. जो सहिष्णू असतो, तो लवचिक नसतो. एखाद्याने आपल्यावर प्रहार केला, तर त्याची तक्रार करीत बसू नका, समाजाला दिशा देण्याचे काम करा.ते म्हणाले, हिंदू धर्मातील प्रेम आणि वेडा यातील फरक सांगताना कोणीही धर्म वेडे नसतात, ते धर्मप्रेमी असतात. जे असेल ते मांडा, जो चुकेल ते शब्दात मांडा. प्रत्येक व्यक्तीने आध्यात्मिक होण्याची गरज आहे, धार्मिक होता कामा नये. जे करायचे आहे, ते बोलायचे नाही. चांगले करण्यासाठी त्रास सोसावा लागतो. यावेळी बँकेचे संचालक, ब्राह्मण सभा, करवीर मंगलधामचे पदाधिकारी उपस्थित होते.
विवेकानंद यांची तत्त्वे सर्वसमावेशक
By admin | Published: December 01, 2015 12:30 AM