कुरुंदवाड : येथील माळभागावरील एका घरात आॅनलाईन कसिनो जुगार खेळताना कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने धाड टाकून नऊजणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३७ हजार ८७० रुपयांसह आठ मोबाईल संच, चार मोटारसायकल, दहा कॉम्प्युटर असा एकूण ४ लाख ९४ हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शनिवारी रात्री नऊच्या सुमारास ही कारवाई केली.
याप्रकरणी चंद्रकांत मारुती माने (रा. कबनूर, ता. हातकणंगले), मोहन लक्ष्मण कोरवी (रा. नांदणी), विजय कागले (रा. कुरुंदवाड), सुनील राजाराम सासणे (रा. गंगापूर, तेरवाड), ओंकार आनंदा चौगुले (रा. शिरढोण), संजय बाबासोा चौगुले (रा. अकिवाट ), बंडू बाबासोा नाईक ( रा. नांदणी), नबीलाल हुसेन पेंडारी, मोहन लक्ष्मण कोरवी (सर्व रा. नांदणी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पथकात स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद कुंभार, पोलीस उपनिरीक्षक प्रसाद कोळपे, पोलीस कॉन्स्टेबल शिवाजी पडवळ, रणजित पाटील, पोलीस नाईक संजय चाचे, अनमोल पोवार, महेश गवळी यांचा समावेश होता.