शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : शरद पवारांच्या राष्ट्रवादीला केवळ 10 जागांवरच मानावं लागलं समाधान; कुठे कोण जिंकलं? बघा संपूर्ण लिस्ट
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
3
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत मोठी उलथापालथ; शेवटच्या फेरीत काँग्रेसने मारली बाजी
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
5
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
6
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
9
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
10
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
12
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
13
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
14
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
15
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
16
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
17
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
18
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
19
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
20
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...

ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य

By admin | Published: April 27, 2015 10:09 PM

मुख्य अभियंता बी. बी. पाटील यांची ग्वाही

संपूर्ण कोकण झोनमध्ये अन्य झोनच्या तुलनेत वीज चोरीचे प्रमाण खूपच कमी आहे. मीटरमध्ये छेडछाड करणे किंवा आकडा टाकण्याचे प्रकार आढळत असले तरी ते चिपळूण व खेड विभागात अधिक आहेत. अन्य विभागात हा प्रकार नगण्य आहे. भरारी पथकाची जिल्ह्यावर करडी नजर आहे. याशिवाय ग्राहकांना आधुनिक सेवा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. कोकण परिमंडल भारनियमनमुक्त आहे. येथील वसुलीचे प्रमाणही चांगले आहे. साहजिकच ग्राहकाभिमुख सेवा देणे महावितरणचे कर्तव्य आहे. त्यासाठी कर्मचाऱ्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांची बांधिलकी आहे. पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरूस्तीची कामे पूर्ण करून ग्राहकांना अधिकाधिक चांगली सेवा देण्यात येईल.कोकणातील किनारपट्टी भागातील पर्यटन, धार्मिक स्थळाकडील वीज वाहिन्या भूमिगत टाकण्यासाठी केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याचप्रमाणे इथला सोसाट्याचा वारा, मुसळधार पावसामुळे होणारा धोका, त्यातून होणारे नुकसान लक्षात घेता भूमिगत वाहिन्यांचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यानंतर हे काम तत्काळ हाती घेतले जाईल, अशी ठाम ग्वाही महावितरणचे कोकण परिमंडलाचे मुख्य अभियंता बी. बी. पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ग्राहकाभिमुख सेवेला प्राधान्य देण्याचा मनोदयही त्यांनी व्यक्त केला. भौगोलिकदृष्ट्या कोकण भाग डोंगरदऱ्यामधून वसलेला आहे. विजेच्या वाहिन्या, खांब डोंगरदऱ्यात असल्याने कर्मचाऱ्यांवर प्रचंड ताण येतो. पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित होतो, त्यावेळी नेमका दोष कोठे आहे, हे शोधून तो दुरूस्त करावा लागतो. नैसर्गिक आव्हानाचा सामना करणे, महावितरण कर्मचाऱ्यांना नित्याचे झाले आहे. कोकणात वसुलीचे प्रमाण चांगले असून, वीजहानीचे प्रमाण अल्प आहे. त्यामुळे येथील ग्राहकांना चांगली सेवा देणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. ग्राहकांचा ताण कमी करण्यासाठी आॅनलाईन पेमेंट सुविधा महावितरणने सुरू केली आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील १ लाख ४४ हजार ९८९ ग्राहकांनी १७ कोटी २२ लाख २५ हजार ८४० रुपयांचा महसूल आॅनलाईनव्दारे महावितरणकडे जमा केला आहे. एकूणच ग्राहकांचा आॅनलाईनकडे वाढता कल दिसून येत आहे. महावितरणने सुरू केलेल्या स्वयंचलित वीजबिल केंद्रालाही ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत आहे. ज्याच्याकडे इंटरनेट सुविधा नाही तसेच तासन्तास रांगेत उभे राहून वीजबिल भरण्यापेक्षा स्वयंचलित मशीनमध्ये (एटीपी) वीजबिल भरणे ग्राहकांना सुलभ झाले आहे. मार्चमध्ये कोकण परिमंडलातील ४२ हजार २३ ग्राहकांनी एटीपीमध्ये वीजबिल भरल्यामुळे ४ कोटी ८६ लाख ४५ हजार ६२२ रुपयांचा महसूल महावितरणला प्राप्त झाला आहे.ग्राहकांच्या समस्या सोडवण्यासाठी टोल फ्री सुविधा सुरू करण्यात आली आहे. ग्राहकांना विनामूल्य तक्रार नोंदवता येत आहे. कोकण परिमंडलातील रत्नागिरी विभागातील ३२८४ ग्राहकांनी गेल्या तीन महिन्यात तक्रारी नोंदवल्या होत्या. संबंधित तक्रारींची तातडीने दखल घेत ३१८४ तक्रारींचे निवारण केले आहे. तीन महिन्यांत केवळ ९८ तक्रारी प्रलंबित असल्याचे दिसून येत आहे. ग्राहकांच्या तक्रारींचे तातडीने निवारण करण्याची महावितरणची भूमिका असल्याचे ते म्हणाले.इन्फ्रा - २ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात ६० कोटी, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३१ कोटीची कामे करण्यात सुरू आहेत. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी चार उपकेंद्र प्रस्तावित आहेत. भविष्यातील रत्नागिरी शहराची गरज लक्षात घेता रहाटाघर येथे स्वतंत्र उपकेंद्र पूर्ण झाले असून, येत्या काही दिवसात ते कार्यान्वित होणार आहे. याशिवाय गंजलेल्या तारा, विजेचे खांब तसेच मीटर बदलण्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी विभागात विजेचे १४८० खांब बदलण्याचे काम सुरू आहे, तर ६३५ विजेचे खांब बदलण्यात आले आहेत. चिपळूण विभागात विजेचे २४३ खांब बदलण्यात आले असून, १५० खांब बदलण्याचे काम सुरू आहे. खेड विभागात विजेचे ११८ खांब बदलण्यात आले असून, ४९८ खांब बदलण्याचे काम सुरू आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली विभागातील विजेचे ११९९ खांब बदलण्यात आले आहेत, तर २५० खांब बदलण्याचे काम सुरू आहे. याशिवाय जुन्या गंजलेल्या वाहिन्या, रोहित्रदेखील बदलण्याचे काम सुरू आहे. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत.कोकणची भौगोलिक रचना डोंगराळ, दऱ्याखोऱ्यांची आहे. दरवर्षी एक हजार कृषिपंप वितरणाचे उद्दिष्ट आहे. मात्र, गेल्या वर्षभरात १५५६ कृषिपंप कनेक्शन देण्यात आले आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात ७३७, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८१९ कृषिपंप कनेक्शन देण्यात आली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी १०२२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १५६६ वीज कनेक्शन्स प्रलंबित आहेत.जिल्ह्यात वीजचोरीचे प्रमाण अल्प आहे. वीजचोरी, वीजगळती शोधण्यासाठी स्वतंत्र भरारी पथक कार्यरत आहे. वर्षभरात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये वीजचोरीची १२३ प्रकरणे उघडकीस आणण्यात आली आहेत. त्याद्वारे २७ लाखांचा महसूल परिमंडळास प्राप्त झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात चिपळूण विभागातील १ लाख ६६ हजार ५३६ ग्राहकांकडून १ कोटी ७८ लाख ४ हजार ६१ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. खेड विभागातील १ लाख ७८ हजार ९९० ग्राहकांकडून २ कोटी ७ लाख ३ हजार ३२ रूपयांची वसुली करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील २ लाख ७८ हजार ८९३ ग्राहकांकडून २ कोटी २९ लाख ८ हजार ८१ रुपयांची वसुली करण्यात आली आहे. एकूणच जिल्ह्यातील वीज हानीचे प्रमाण अल्प आहे, शिवाय वसुलीचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे कोकण परिमंडलातील भारनियमन बंद आहे. ज्या फिडर्सवर ४२ टक्क्यांपेक्षा अधिक वाणिज्यिक व वितरण हानी आहे. तसेच ई, एफ व जी गटात समावेश होणाऱ्या फिडर्सवर फिडर फ्रॅन्चायझी योजनेंतर्गत विद्युत अभियंता किंंवा महावितरणमधील सेवानिवृत्त अभियंते यांची फिडर फ्रॅन्चायझी व्यवस्थापक म्हणून नेमणूक करण्यात येणार आहे. परंतु कोकण परिमंडलास फिडर व्यवस्थापकापासून मुक्ती मिळणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यात १५१, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ८५ मिळून एकूण परिमंडलात एकूण २३६ फिडर्स आहेत. परंतु सर्व फिडर्स अ, ब, क, ड वर्गात आहेत. त्यामुळे कोकण परिमंडलास फिडर व्यवस्थापकाची आवश्यकता नाही.सध्या परिमंडलात वॉचमन ते चीफ इंजिनियरपर्यंतच्या २६९८ पैकी ५१९ पदे रिक्त आहेत. विद्युत सहाय्यकांच्या १५०० पैकर ३५० जागा रिक्त आहेत. एकूण २० टक्के पदे रिक्त आहेत. मात्र, विद्युत सहायक भरतीमुळे ३५० पदे लवकरच भरली जाणार आहेत. उर्वरित रिक्त पदे प्रशासनाकडून भरली जातील, अशी अपेक्षा आहे. कोकण परिमंडलात बारा महिला विद्युत सहायक कार्यरत असून, त्यांच्याकडून व्यवस्थितरित्या कामे करण्यात येत आहेत. फिल्डवरही कुशल पध्दतीने काम करत आहेत.- मेहरून नाकाडे