शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
2
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
3
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
4
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
5
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
7
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
8
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
9
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
11
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
12
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
13
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
14
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
15
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
16
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
17
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
18
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
19
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?

अंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद, देवस्थानच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2019 10:50 AM

करवीरनिवासिनी कोल्हापूरची श्री अंबाबाई मंदिरात खासगी पुजाऱ्यांकडून केले जाणारे अभिषेक बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. देवीच्या पूजेचा वार असलेले श्रीपूजक आणि देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य कोणत्याही पुजाऱ्यांना आता गरुड मंडपात अभिषेक करता येणार नाही.

ठळक मुद्देअंबाबाई मंदिरातील खासगी अभिषेक बंद, देवस्थानच्या बैठकीत निर्णयभाविकांच्या फसवणुकीला बसणार आळा

कोल्हापूर : करवीरनिवासिनी कोल्हापूरची श्री अंबाबाई मंदिरात खासगी पुजाऱ्यांकडून केले जाणारे अभिषेक बंद करण्याचा निर्णय पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. देवीच्या पूजेचा वार असलेले श्रीपूजक आणि देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य कोणत्याही पुजाऱ्यांना आता गरुड मंडपात अभिषेक करता येणार नाही.लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेनंतर प्रथमच झालेल्या पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बैठकीत अतिक्रमण हटाव मोहीम तीव्र करणे, मंदिर परिसराचा विकास, गरजू रुग्णांसाठी लॅब, देवस्थानअंतर्गत मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी निधी वाटप, मंदिराच्या पाचही शिखरांचे स्ट्रक्चरल आॅडिट अशा महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी समितीचे अध्यक्ष महेश जाधव, कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सचिव विजय पोवार, सदस्या संगीता खाडे, शिवाजीराव जाधव, एस. एस. साळवी, सुयश पाटील उपस्थित होते.अंबाबाई मंदिराच्या गरुड मंडपात रोज अभिषेक विधी केला जातो. मंदिरात देवीच्या पूजेचा आठवडा असलेले पुजारी व देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य पुजारीदेखील येथे अभिषेक विधी करतात. यांतील काही पुजारी हे श्रीपूजकांकडे सेवेकरी म्हणून काम करतात, तर काही पुजारी बाहेरचे आहेत.

अशा पुजाऱ्यांकडून भक्तांना देवीचा अभिषेक घडवून दिला जातो, परस्पर पावती केली जाते, भरमसाट दक्षिणा घेतली जाते, यातून भाविकांची लूट व फसवणूक होते, अशा तक्रारी समितीकडे आल्या आहेत. याची दखल घेत समितीने वार असणारे श्रीपूजक व देवस्थान समितीचे पुजारी वगळता अन्य खासगी पुजाऱ्यांना अभिषेक करण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे.याशिवाय परिसरातील पूजेचे साहित्य विकणारे दुकानदार, हारविक्रेते, समितीचे सुरक्षारक्षक यांच्याकडून भाविकांना व्हीआयपी दर्शन घडविले जाते. त्यासाठी पैशांचीदेखील देवाणघेवाण होते. या प्रकारावरही समिती निर्बंध घालणार आहे. दरम्यान, मंगळवारच्या बैठकीत देवस्थान समितीअंतर्गत असलेल्या मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी धनादेशाचे वाटप करण्यात आले.अतिक्रमण हटाव मोहीम आजपासूनसमितीने मंदिराच्या निश्चित केलेल्या हद्दीतील अतिक्रमण हटविण्यासाठी महापालिकेला पत्र देण्यात आले आहे. परिसरातील गार्डन, माउली लॉज, खासगी मंदिरांचा यात समावेश आहे. त्याबाबत आज, बुधवारी सकाळी ११ वाजता पुन्हा पाहणी करण्यात येणार आहे.

सोन्याच्या मुलाम्यासाठी शिखरांचे स्ट्रक्चरल आॅडिटअंबाबाई मंदिराच्या पाचही शिखरांना सोन्याचा मुलामा देण्याच्या दृष्टीने शिखरांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. पिडिलाईट या कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले असून, ते विनामोबदला ही सेवा देणार आहेत. शिखरांची स्थिती, मोजणी याबाबत माहिती घेतल्यानंतर सोन्याचा मुलामा देण्यासंबंधीचा अंतिम निर्णय घेतला जाईल. सोन्याचा मुलामा देण्यासाठी सात कोटींचा खर्च अपेक्षित आहे.

कार्यालयाचे नूतनीकरणसमितीच्या शिवाजी पेठेतील मुख्य कार्यालयाचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तीन हजार स्क्वेअर फूट जागेत होणाऱ्या या कामासाठी ८० ते ८८ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. हे नूतनीकरण होईपर्यंत समितीचे कार्यालय त्र्यंबोली टेकडी येथे हलविण्यात येणार आहे. पुढील दोन दिवसांत ही कार्यवाही सुरू होईल.लॅबसाठी देवल क्लबची जागासमितीच्या वतीने गरजू रुग्णांसाठी माफक दरात विविध प्रकारच्या आरोग्य तपासण्या करून देणारी लॅब सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी खासबाग येथील नवीन देवल क्लबच्या मागील बाजूची इमारत निश्चित करण्यात आली आहे. सध्या ती भाडेतत्त्वावर घेण्यात येणार असली तरी भविष्यात खरेदी करण्याचा समितीचा विचार आहे. 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूर