शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
3
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
4
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
5
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
6
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
7
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
8
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
9
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
10
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
11
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
12
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
13
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
14
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
15
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
16
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
17
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
18
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
19
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
20
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला

खासगी एजन्सीकडून कर्मचारी घेणार, महापालिका बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 03, 2020 5:52 PM

शहर स्वच्छतेच्या कामाकरिता आरोग्य विभागाकडे कर्मचारी अपुरे पडत असल्याने कर्मचारी पुरवठा करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा निर्णय गुरुवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.

ठळक मुद्देखासगी एजन्सीकडून कर्मचारी घेणारमहापालिका बैठकीत निर्णय : आठ दिवसांत कार्यवाही

कोल्हापूर : शहर स्वच्छतेच्या कामाकरिता आरोग्य विभागाकडे कर्मचारी अपुरे पडत असल्याने कर्मचारी पुरवठा करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा निर्णय गुरुवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.महापालिकेच्या आरोग्य, नगररचना, पाणीपुरवठा, वाहतूक व विभागीय कार्यालय यांच्याकडील प्रकल्पांचा आढावा महापौर लाटकर यांनी गुरुवारी घेतला. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.शहरातील प्रमुख मार्गांवरील फूटपाथवर उगवलेली झाडेझुडपे काढावीत, त्यांची स्वच्छता करण्यात यावी, शहरातील रस्त्यांची पॅचवर्कची कामे गतीने करण्यात यावीत; शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे; नवीन रस्ता करण्यापूर्वी पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग, वॉर्ड आॅफिस व विद्युत कंपनी यांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना महापौर लाटकर यांनी यावेळी दिल्या.

अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम व रिस्टोलेशनचे काम प्रगतिपथावर नाही. त्यांच्या कामाचे अद्याप नियोजन झालेले नाही याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली.शहरातील बंदिस्त झालेल्या २१ ठिकाणांचे पार्किंग खुले करण्यात आले असून ही कारवाई अधिक तीव्र करून सदरचे पार्किंग नागरिकांना खुले करून द्यावे, असे महापौरांनी सांगितले. वाहतूक विभागाशी चर्चा करून शहरातील पार्किंग, नो पार्किंग, सम व विषम पार्किंग झोन निश्चित करण्याचे बैठकीत ठरले. व्हीनस कॉर्नर येथील वाहनतळावर अंबाबाई मंदिराकडे येणारी वाहने लावण्यास तत्काळ सुरू करण्याचेही यावेळी ठरले.याप्रसंगी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, नगरसेविका स्वाती यवलुजे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, साहाय्यक संचालक प्रसाद गायकवाड, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रभारी जलअभियंता कुंभार, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रावसाहेब चव्हाण, आर. के. जाधव, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार नारायण भोसले, एन. एस. पाटील, आदी उपस्थित होते.

 

 

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर