शहरं
Join us  
Trending Stories
1
तिरुपती लाडू प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी; मुख्यमंत्री खोटारडे, त्यांना समज द्या : जगनमोहन रेड्डी
2
रश्मी ठाकरे पुढच्या मुख्यमंत्री...! कलानगरात झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चा
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरी व व्यापारात लाभ होतील; अचानक धन प्राप्ती होईल
4
चार हजार वर्षांपूर्वीच्या प्राचीन वस्तू अमेरिका भारताला देणार; पंतप्रधानांनी मानले आभार
5
अग्रलेख : पंतप्रधान पुन्हा आक्रमक; महायुतीची सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा सरसावला
6
मराठा, ओबीसी आरक्षणावरून तणाव कायम; वडीगोद्रीत दोन्ही समाजांचे आंदोलक रस्त्यावर
7
पोलिस करतात विनातिकीट प्रवास, धमक्या देतात; रेल्वे टीसींची नाराजी
8
देवाच्या प्रसादात राजकारण कशाला कालवता?
9
बापरे बाप, धावत्या रेल्वेत निघाला भलामोठा साप; प्रवाशांची धावपळ उडाली, पहा Video...
10
नाना पटोलेच होतील पुढील मुख्यमंत्री; काँग्रेस नेत्याचा दावा, नागपुरातील सहाही जागांवर लढणार
11
PM Modi US Visit Live: ...पण नियतीने मला राजकारणात आणले; मोदींनी अमेरिकेत भारतीयांसमोर मन मोकळे केले
12
Pune Rain Update: तीन दिवस उकाडा, पुण्यात मुसळधार पावसाला सुरुवात; अवघ्या 5 मिनिटात रस्त्याला नदीचे स्वरूप
13
मालदीवनंतर श्रीलंकाही चीनच्या गळाला; मार्क्सवादी अनुरा कुमारा दिसानायके नवे राष्ट्रपती
14
हिजबुल्लाहने इस्रायलचे आयर्न डोम फेल केले; नागरिकांवर बंकरमध्ये लपण्याची वेळ
15
धक्कादायक! अरबाज पटेल घराबाहेर, आठ आठवड्यांचा प्रवास संपला; निक्कीला अश्रू अनावर
16
एसटी महामंडळाचे अध्यक्षपद गोगावलेंनी नाकारले? कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेणार
17
चिपळूणमध्ये मोठी घडामोड! भास्कर जाधवांचा मुलगा अजित पवारांच्या भेटीला
18
खंबाटकी घाटात थरार! कंटेनर आठ वाहनांना धडकला; पाचजण जखमी 
19
मुकेश अंबानी यांनी खरेदी केले सर्वात महागडे विमान; किंमत ऐकून फक्त 'शून्य' मोजत बसाल...

खासगी बस जळून खाक, ३५ प्रवाशी सुखरूप. कोल्हापूरनजीक शेणवडे येथील घटना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2018 10:36 AM

मुंबईहून गोव्याकडे जात असलेल्या रेजिना या टॅÑव्हलसला शॉटसर्किट ने आग लागून ती जळून खाक झाली. मात्र यामध्ये असणाऱ्या एकूण ३५ प्रवाशांना चालक जॉर्ज फर्नांडिस यांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढत त्यांच्या सुरक्षितेची परिपूर्ण काळजी घेतली.

ठळक मुद्देमुंबईहून गोव्याकडे जाणारी खासगी बसप्रवाशी,ग्रामस्थ यांच्याकडून आग विझविण्यासाठीचे प्रयत्न अपुरे घटनेची नोंद पोलीस ठाण्यातया मार्गावरील ही घटना, चार महिन्यापूर्वीही एक खासगी बस येथे जळून खाक

कोल्हापूर : मुंबईहून गोव्याकडे जात असलेल्या रेजिना या टॅÑव्हलसला शॉटसर्किट ने आग लागून ती जळून खाक झाली. मात्र यामध्ये असणाऱ्या एकूण ३५ प्रवाशांना चालक जॉर्ज फर्नांडिस यांनी मोठ्या शिताफीने बाहेर काढत त्यांच्या सुरक्षितेची परिपूर्ण काळजी घेतली. ही घटना पहाटे ३. २० च्या सुमारास पहाटे कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबाबडा तालुक्यातील शेणवडे गावानजीक घडली.

रेजिना ही ट्रॅव्हलस (जी.ए. ०८-सी- ६५५५) ही मुंबईहून गोव्याकडे जात होती. पहाटे गगनबाबडा तालुक्यातील शेणवडे गावानजीक आली असता, यावेळी चालक फर्नांडिस यांना गाडीत शॉटसर्किट होत असल्याचे जाणवले. त्यांनी तत्काळ ट्रॅव्हलसला बाजू घेत प्रवाशांना आधी सुखरूप बाजूला काढले. यानंतर गाडीतील प्रवाशी तसेच वाहक ईमानसाहब व परिसरातील लोकानी धावाधाव करीत लागलेली आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आगीने घेतलेल्या रौद्ररुपपुढे ग्रामस्थांसह सर्वांचे प्रयत्न अपुरे पडले.

यानंतर घटनास्थळी पोलीस पाटील, गगणबाबडा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन मदनव्वाना व अग्निशमनदल दाखल झाले. सर्वांनी तातडीने आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. परंतु घटनास्थळी वेळेत मदत मिळेपर्यंत या ट्रॅव्हलसने पूर्ण पेटून जळून खाक झाली होती. सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. या घटनेची दखल पोलीस ठाण्यात घेतली असून गगनबावडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करून घेण्याचे काम सुरु आहे.यामध्ये गाडीचे पूर्णत: तसेच प्रवाशांच्या जवळ असलेल्या महत्वाच्या साहित्याचे मोठे नुकसान झाले.या परिसरातील ही दुसरी घटनाचार महिन्यापूर्वी देखिल एक खासगी बसने लोंगे येथे पेट घेतला होता. त्यातही ती बस जळून खाक झाली होती. त्यामुळे खासगी आराम बसच्या सुरक्षेतेविषयी पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

टॅग्स :Bus Driverबसचालकkolhapurकोल्हापूर