शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

कोल्हापूर  महापालिकेच्या उद्यानांसाठी खासगी सुरक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:06 PM

कोल्हापूर महापालिकेची ५४ उद्याने, मैदाने व सांस्कृतिक हॉल, आदींच्या सुरक्षेसाठी खासगीरक्षक नेमण्याचा प्रस्ताव आहे. उद्यान आणि मैदाने तळिरामांचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्या वेळी येथे अवैध प्रकारांना ऊत येतो. या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिकेच्या उद्यानांसाठी खासगी सुरक्षा अवैध प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी प्रस्ताव

कोल्हापूर : महापालिकेची ५४ उद्याने, मैदाने व सांस्कृतिक हॉल, आदींच्या सुरक्षेसाठी खासगीरक्षक नेमण्याचा प्रस्ताव आहे. उद्यान आणि मैदाने तळिरामांचे अड्डे बनले आहेत. रात्रीच्या वेळी येथे अवैध प्रकारांना ऊत येतो. या प्रकारांना प्रतिबंध घालण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक तैनात करण्यात येणार असल्याची माहिती शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी दिली.शहरात महापालिके ची ५४ उद्याने आहेत. तसेच अनेक सांस्कृतिक हॉल व मैदानांची सुरक्षा रामभरोसे आहे. हॉल व मैदानांवर कर्मचारी तैनात आहेत. त्यावर मर्यादा आहेत. सुरक्षेसाठी महापलिकेचे कर्मचारी तीन शिफ्टमध्ये काम करतात. तरीही महापालिकेच्या या मिळकतींमध्ये रात्रीच्या वेळी अवैध प्रकारांना ऊत येतो. मैदाने ओपन बार बनली आहेत. याबाबत नागरिकांतून तक्रारी येत आहेत. महापालिकेची यंत्रणा कमी पडत असल्याने तक्रारींकडे कानाडोळा केला जात असल्याने नाराजी आहे.ओपन बारवर पोलीस प्रशासन वेळोवेळी कारवाई करते; पण कारवाईनंतर पुन्हा ओपन बार जोरात सुरू होतात. महापालिकेची यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अवैध वापरामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. उद्यानांमध्ये जेवणावळीसह ओपन बार, गांजा पार्ट्या रंगतात, याची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. काही दिवसांपूर्वी महापालिकेत झालेल्या आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी खासगी सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना केली होती.ही ठिकाणे सुस्थितीत व सुरक्षित राहण्यासाठी खासगी सुरक्षारक्षक नेमण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. बांधकाम विभागाने तयार केलेला प्रस्ताव रचना व कार्यपद्धती विभागाकडे पाठविला आहे. आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी म्हैसूर अभ्यासदौऱ्यावरून आल्यानंतर यावर ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.

 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाkolhapurकोल्हापूर